Headlines

जरांगे पाटलांना एकनाथ शिंदे रसद पुरवल्याचा आरोप भाजपनेच केला होता:लोकांनी लोकशाही संपवली, तेच आज लोकशाहीवर बोलतात- विजय वडेट्टीवार




पूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा होती की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे रसद पुरवत आहेत. मात्र, हा आरोप कोणी केला असेल, तर तो भाजपवाल्यांनीच केला होता. त्यांना 500 कोटी रुपये दिल्याची चर्चाही भाजपनेच घडवून आणली होती,असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजयादशमीच्या कार्यक्रमात प्यारे खान यांना का बोलावले? असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले, आतापर्यंत महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचा एकही मंत्री ठेवण्यात आला नाही. अशा स्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या मोर्च्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय उत्तर देणार, याकडे आमचे लक्ष लागून आहे. जे लोक स्वतः लोकशाही संपवत आहेत, तेच आज लोकशाहीवर शिकवणी देत असतील, तर याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणावे लागेल, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. सध्याच्या कारभारावर जनता नाराज असून, याच पद्धतीमुळे जनता आता रस्त्यावर उतरत असल्याचेही ते म्हणाले. सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात वातावरण तयार करताय विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेतील लोक एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी असे आरोप करत असून, त्यातून एकमेकांच्या विरोधात वातावरण तयार केले जात आहे. जरांगे पाटील यांच्याविरोधात जे-जे लोक बोलले आहेत, त्यांनी पुढे येऊन आपले पुरावे सिद्ध करावेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना, अभिजित वंजारी हे प्रचंड मतांनी विजयी होणार असून त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अन्न-नागरी पुरवठा विभागात मोठा घोटाळा विजय वडेट्टीवार म्हणाले की, अन्न-नागरी पुरवठा विभागाच्या कारभारात प्रचंड मोठा घोळ असून इथे मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर अनेक जण थेट तुरुंगात जातील. तसेच, शिवाजी शिक्षण संस्थेवर एसआयटी चौकशी लावण्याबाबत सत्ताधारी बोलत आहेत, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, या प्रकरणात मी कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विशिष्ट संस्थेवर एसआयटी लावण्याची मागणी केली जात असेल, तर त्याला अर्थ उरत नाही. हे ही वृत्त वाचा संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा:म्हणाले- पंतप्रधान मोदींची एक्सपायरी डेट संपली, एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात, मे शेवटचा आठवडा असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक्सपायरी डेट’ आता संपली असून, आगामी एप्रिल महिन्यापासून त्यांची घसरगुंडी सुरू होईल आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचे सरकार कोसळेल, असा अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *