.

शहराच्या स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व महानगरपालिकेचे समीकरण अजूनही जुळले नाही. कोणार्क कंपनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरत आहे. त्याचा साहजिकच परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होत आहे. नियमित वेतन देण्यात अपयशी ठरत असल्यामुळे कोणार्कचे कर्मचारी ऐन सण-उत्सव पाहून कामबंद आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. गणेशोत्सवात शहरात अस्वच्छतेने कहर केला. त्यानंतर परिस्थिती काहीशी सुधारत नाही तोच, ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी कोणार्क कंपनीने त्यांच्या घरोघरी कचरा उचलणारी वाहने चोरीला गेल्याची तक्रार केली. काही माजी कंत्राटदारांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली. त्यानंतर कोणार्ककडे निधीच नसल्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात शहरात घंटागाड्याच फिरकल्या नाहीत. पेट्रोल पंपांनी उधारीवर डिझेल देण्यास नकार दिला. त्यामुळे शहरात सर्वत्र कचरा पडून आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त गरब्यांचे आयोजन करण्यात आले. दुर्गोत्सव मंडळांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. त्यामुळेही कचरा साचणार आहे. तोवर स्थिती सामान्य झाली तरच शहरात काही प्रमाणात स्वच्छता दिसेल. अन्यथा कोणार्क कंपनीची मनमानी, महानगरपालिकेचा त्यांच्यावर नसलेला वचक शहरवासीयांचा अंत पाहत राहणार आहे. Q. शहरातील अस्वच्छतेची स्थिती सुधारत का नाही? A. अस्वच्छता कमी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. Q. कोणार्क कंपनी गंभीरपणे काम करीत नाही काय? A. तसे नाही. काही तांत्रिक अडचणी आहेत. निधीचीही अडचण आहे. Q. तांत्रिक अडचणी कोणत्या, त्या केव्हा सुटणार? A. तांत्रिक अडचणी म्हणजे वाहनांची संख्या अपुरी आहे. काहींनी वाहने परत नेली आहेत. त्यांची उणीव भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Q. निधीअभावी कोणार्कने काम ठप्प ठेवले काय? A. हो. ही बाब नाकारता येणार नाही. आता त्यांच्या डिझेलचा प्रश्न सुटला आहे. दोन दिवसांत सर्वत्र घंटागाड्या फिरताना दिसतील. शहरातील एकूणच अस्वच्छतेची स्थिती आहे. त्यावरून सातत्याने धारेवर धरले जात असलेले मनपा स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव हे नवरात्रोत्सवाच्या आधीपासून (१५ दिवसांपासून) सुटीवर आहेत. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून डॉ. पाठबागे यांच्याकडे तात्पुरते काम सोपवण्यात आले आहे. डॉ. संदीप पाठबागे, प्र. स्वच्छता अधिकारी, मनपा
स्वच्छता अधिकारी सुटीवर, प्रभारींकडे काम
परिसर स्वच्छता तर सोडा, घंटागाडीही येत नाही ^शहरातील रस्ते, परिसराची स्वच्छता होणार, याचा विचारच करणे सोडून दिले आहे. कार्यक्रम, उत्सवप्रसंगी आम्हीच परिसर, रस्ते झाडून स्वच्छ करतो. किमान घंटागाडी दररोज यायला हवी, अशी अपेक्षा असते. तसे होत नाही. ती आठवड्यातून एकदा येते. – सपना राऊत, नागरिक.
उणीव भरून काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू