Headlines

Uday Samant Demands SIT Probe Into Manoj Jarange Shrikant Shinde Audio


“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित लोकांची नावे ऐकायला मिळत आहेत. या कथित क्लिपच्या माध्यमातून शिवसेना आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव रचल्याचे स्पष

.

मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी 500 कोटींच्या देवाणघेवाणीचा विषय संपल्याचे सांगत, आंदोलनाला बदनाम करणाऱ्या आणि मित्रपक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवणाऱ्या सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी केली.

श्रीकांत शिंदेंचे नाव घेऊन शिवसेना बदनाम करण्याचे षड्यंत्र!

ऑडिओ क्लिपमधील संभाषणावर तीव्र आक्षेप घेत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी किंवा संभाषणाशी काडीमात्र संबंध नाही. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव या प्रकरणात घेतले की थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना बदनाम होते. शिवसेना आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वितुष्ट निर्माण करून राजकीय लाभ उठवण्यासाठीच 2 ते 2.5 वर्षांपूर्वी रचलेले हे षड्यंत्र आहे का, याचा छडा लागला पाहिजे.”

500 कोटींचा विषय कालच संपला

“एकनाथ शिंदे साहेबांनी कालच जाहीर सभेत स्पष्ट केले की त्यांनी कोणालाही पैसे दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत. स्वतः जरांगे पाटलांनीही आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 500 कोटी रुपये देणे आणि घेणे हा विषय मुळात कालच संपलेला आहे. मात्र, क्लिपमधील एका महिलेने भाजपशी संबंधित संभाषणात 500 कोटींचा उल्लेख करून शिंदे साहेबांची नाहक बदनामी केली आहे; त्या महिलेची सर्वप्रथम कसून चौकशी झाली पाहिजे.”

एसआयटी, सायबर अन् फॉरेन्सिक चौकशी करा; भाजपने भूमिका स्पष्ट करावी!

मित्रपक्षातील लोकांच्या नावांचा संदर्भ देत सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे निष्पक्ष तपासाचे साकडे घातले. “या ऑडिओ क्लिपमध्ये आंदोलन कसे चिरडायचे, आंदोलनकर्त्यांना गाड्या कोण पुरवत आहे, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा आणि यंत्रणांचा वापर कसा करायचा, यावर चर्चा झाल्याचे दिसते. हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. या क्लिपमधील संभाषणांचे ऑडिओ सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून आवाजांची पडताळणी झाली पाहिजे.”

भाजपने खुलासा करावा

“या क्लिपमध्ये जे लोक बोलत आहेत, ते भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. जर हे संभाषण आणि त्यातील आवाज खरे असतील, तर अशा प्रवृत्तींवर भारतीय जनता पार्टी नेमकी काय कारवाई करणार, हे स्पष्ट झाले पाहिजे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत असताना सत्तेतील मित्रपक्षाच्याच नेत्यांना टार्गेट करणे कितपत योग्य आहे?”

जरांगेंशी मतभेद असले तरी त्यांच्या लढ्याचा आदर!

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना उदय सामंत यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. “आज मनोज जरांगे पाटील आणि आमच्यात काही मतभेद झाले असतील, ते शिंदे साहेबांवर किंवा सरकारवर टीका करत असतील; तरीही जरांगे यांनी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी प्रामाणिक लढा दिला हे कोणीही नाकारू शकत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांना कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळवून दिले. मात्र, अशा खोट्या क्लिप्सच्या माध्यमातून समाजात विष पेरण्याचे आणि मराठा आंदोलनात गैरसमज पसरवण्याचे काम करणाऱ्यांचा बुरखा फाटलाच पाहिजे.”

या ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेला वाद आता महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर एसआयटी चौकशीचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

—————————————————-

हेही वाचा…

मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.