Headlines

Rajendra Raut Slams Rohit Pawar; Barshi Political Controversy


“मी केवळ माझ्या राजकीय उंचीच्या नेत्यांवरच थेट बोलतो. रोहित पवारांसारख्या पिल्लांवर उत्तर देण्यासाठी मी आमच्या घरचा पाचवीत शिकणारा पोरगा प्रवक्ता म्हणून नेमून ठेवला आहे. जेवढे रोहित पवारांचे आजचे वय आहे, तेवढा आमचा राजकारणात आणि समाजकारणात घामाचा संघ

.

गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. रोहित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत पवार घराण्यावर थेट निशाणा साधला.

रोहित पिल्लूला फार खुमखुमी; आमचा संघर्ष त्यांच्या वयाएवढा!

रोहित पवारांच्या राजकीय समजुतीवर प्रश्न उपस्थित करत राजेंद्र राऊत म्हणाले, “पिल्लू रोहित बाळाला हल्ली जरा जास्तच खुमखुमी चढली आहे. स्वतःला राज्यस्तरीय मोठा नेता म्हणून घेण्याचा एक प्रकारचा मानसिक रोग त्यांना झाला आहे. रोहित पवारांचे आज जेवढे वय आहे, तेवढा आमचा प्रत्यक्ष मैदानातला राजकीय संघर्ष आहे. सर्वसामान्यांची, गोरगरिबांची मुले कष्टाने मोठी झाली की पवार घराण्याच्या पोटात लगेच दुखायला लागते.”

चिंचा-बोरांवरून संपत्तीवर सवाल

“रोहित पवारांचे वडील जाहीरपणे सांगतात की, आमचा रोहित लहानपणी चिंचा आणि बोरे विकायचा. मला त्यांना विचारायचे आहे, लहानपणी चिंचा-बोरे विकणारा हा माणूस आज नक्की काय विकतोय? आज अचानक सोनं विकायला लागला का? राज्यात केवळ खोटे नॅरेटिव्ह पसरवून अराजकता माजवण्याची सुपारी रोहित पवारांनी घेतली असून, ‘उठसूट मला मोजा’ अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे.”

शिवाजी महाराजांच्या सैन्यात रक्त सांडणारा आमचा इतिहास

पवार कुटुंबाच्या ऐतिहासिक आणि राजकीय भूमिकेवर गंभीर आरोप करताना राऊत म्हणाले, “रोहित पवार आणि त्यांच्या घराण्याची माझ्यावर बोलण्याची पात्रता तरी काय आहे? आमचे घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात खांद्याला खांदा लावून लढलेले, स्वराज्यासाठी रक्त सांडलेले निष्ठावंत घराणे आहे. याउलट, तुमचे घराणे नेहमी स्वार्थासाठी गद्दारी करण्यात पुढे राहिले. हे लोक स्वतः कधी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकत नाहीत.”

शिवजयंती आणि दुष्काळाचे खापर

“दुसऱ्या कोणाला तरी वाईट वाटेल, अल्पसंख्याकांची मते जातील या भीतीपोटी तुम्ही कधी अधिकृतपणे शिवजयंती साजरी करण्याचे धाडस दाखवले नाही. आज महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यावर जो पाण्याचा दुष्काळ ओढवला आहे, त्याला खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचे आडमुठे आणि स्वतःच्या पट्ट्यात पाणी पळवणारे राजकारणच जबाबदार आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

बार्शीत येऊन नौटंकी बंद करा

रोहित पवारांच्या बार्शी दौऱ्याची आणि प्रचाराची खिल्ली उडवताना आमदार राऊत म्हणाले, “तुम्ही आयुष्यभर बार्शीत, जिल्ह्यात आणि राज्यात षड्यंत्राचे राजकारण केले; पण बार्शीतील राजेंद्र राऊत हा सामान्य कार्यकर्ता तुमच्या खानदानाला कधीही भीक घालत नाही आणि तुमच्या दबावाला बळी पडत नाही. नौटंकी करण्यासाठी रोहित पवार बार्शीत आले होते. त्या सभेला गर्दी तरी किती होती?”

शिक्षक-पदवीधरांचा पाठिंबा शून्य

“प्रचाराच्या सभेत रोहित पवारांनी विचारले की शिक्षक मतदार किती आहेत? समोरून 1 बोटही वर झाले नाही. नंतर विचारले पदवीधर मतदार किती आहेत? तेव्हा जेमतेम 5 ते 6 जणांनी हात वर केले. ज्या कॉलेजच्या आवारात एरवी सहज 200 ते 300 मुले थांबलेली असतात, तिथे यांची ही अवस्था झाली. एकाही शाळेने किंवा संस्थेने तुम्हाला दारात उभे केले नाही. त्यामुळे बार्शीत येऊन फुकटचा शहाणपणा करू नका, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा सज्जड दम आमदार राजेंद्र राऊत यांनी शेवटी दिला.

————————————————————-

हेही वाचा…

अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!:संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार

“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.