Headlines

Ramdas Athawale Slams Sanjay Raut Over Amit Shah Lawrence Bishnoi Remark


“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची तुलना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी करणे अत्यंत चुकीचे आणि अयोग्य आहे. अमित शहा हे देशाचे जबाबदार गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. संजय राऊत यांना अशी

.

शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लॉरेन्स बिश्नोई गँगचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला होता. या विधानावर ‘आयएएनएस’ (IANS) या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कडक शब्दांत समाचार घेतला.

अमित शहा देशाचे गृहमंत्री; बिश्नोईशी तुलना अत्यंत चुकीची!

संजय राऊत यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत रामदास आठवले म्हणाले, “अमित शहा हे भारताचे गृहमंत्री असून भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. अशा घटनात्मक जबाबदारीवर असणाऱ्या नेत्याची तुलना एका गुन्हेगाराशी किंवा बिश्नोई गँगशी करणे पूर्णपणे अनुचित आहे. विरोधकांनी राजकीय टीका करताना मर्यादांचे भान ठेवले पाहिजे.”‘

संजय राऊतांना जुनीच सवय

“संजय राऊत रोज अशा प्रकारची विधाने करत असतात. 2024 ची लोकसभा निवडणूक सुरू असतानाही ते ‘आमची सत्ता येणार’ असेच छातीठोकपणे सांगत होते आणि आताही तेच पालुपद आळवत आहेत. सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार नक्कीच प्रत्येकाला आहे; पण निराधार आरोप करून सरकार बदलता येत नाही.”

हा बांगलादेश नाही, बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा भारत

विरोधकांच्या ‘रेझिम चेंज’ आणि रस्त्यावरील आंदोलनांच्या भूमिकेवर बोलताना आठवले यांनी सुनावले. “उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, एखाद्या आंदोलनाला पाठिंबा देणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, रस्त्यावर उतरून किंवा आंदोलनांच्या माध्यमातून सत्ता उलथवून टाकू, अशी भाषा करणे लोकशाहीत चालणार नाही.”

निवडणुकीतूनच सत्ता परिवर्तन

“काही मंडळी परदेशातील घडामोडींचा दाखला देतात; पण हा बांगलादेश नाही. हा भारत देश असून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्वोच्च आहे. सत्ता बदलायची असेल, तर त्यासाठी लोकशाही मार्ग म्हणजेच सार्वत्रिक निवडणुका हाच एकमेव पर्याय असतो. निवडणुकीत जनतेचा कौल घेऊनच सत्ता बदल होऊ शकतो; रस्त्यावरील अराजकतेने नाही,” असे आठवले यांनी स्पष्ट केले.

लोकशाही मार्गाचा आदर करण्याचे आठवलेंचे आवाहन

संजय राऊत आणि महाविकास आघाडीकडून सातत्याने तपास यंत्रणा, निवडणूक आयोग आणि न्यायालयावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, रामदास आठवले यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील महायुती आणि एनडीए (NDA) सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, विरोधकांचे सत्तांतराचे मनसुबे धुळीस मिळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

—————————————————–

हेही वाचा…

भांडुपमध्ये नगरसेवक निवडून आणायची धमक नाही: त्यांनी अमित शहा-मोदींवर बोलू नये; चित्रा वाघ यांचा राऊत-ठाकरेंवर पलटवार

शिवाजी पार्कवर पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली होती. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना थेट गुंड लॉरेन्स बिश्नोईशी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप केला होता. या सर्व आरोपांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.