Headlines

अमित शहा नव्हे, तर उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातील दाऊद इब्राहिम:दसरा मेळाव्यातील टीकेवर नितेश राणेंचा पलटवार, म्हणाले- शिवाजी पार्क गोमूत्राने शुद्ध करा




शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून ठाकरे गटाने भाजप आणि महायुतीवर केलेल्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केल्यानंतर, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना थेट ‘दाऊद इब्राहिम’शी केली आहे. तसेच, शिवाजी पार्कवर शरियाची गुंज ऐकू आल्याचा आरोप करत हे मैदान गोमूत्राने शुद्ध करण्याची मागणी राणे यांनी केली आहे. ‘उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातील दाऊद इब्राहिम’ संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, अमित शहा साहेबांना लॉरेन्स बिश्नोई म्हणण्यापेक्षा, तुमचे मालक उद्धव ठाकरे जे आता दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत गेलाय, त्याच्यांबद्दल बोला. दाऊद इब्राहिमचे काम आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रात बसून करत आहेत. जिहाद्यांना आणि बांगलादेशी घुसखोरांना ताकद देण्याचे काम ते करत आहेत.” ‘बॅनरवर जिना आणि उमर खालिदचा फोटो लावा’ दसरा मेळाव्यातील विचार देशविरोधी असल्याचे सांगत राणे म्हणाले, “ज्या अभिजीत दिपकेचे ठाकरे समर्थन करत होते, तो उमर खालिदचा समर्थक आहे, आणि खालिद हा अफझल गुरूचा समर्थक आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेही अफझल गुरूचे समर्थक झाले. त्यामुळेच मी आधीच सांगितले होते की, व्यासपीठावर बाळासाहेब आणि माँसाहेबांचा फोटो लावू नका, तिथे मोहम्मद अली जिना आणि उमर खालिदचा फोटो लावा.” ‘शिवाजी पार्क गोमूत्राने शुद्ध केले पाहिजे’: ठाकरे गटावर हिंदू द्वेषाचा आरोप करत राणे म्हणाले, “ज्या शिवाजी पार्कवरून बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ची गर्जना केली, तिथे काल पाकिस्तानचे स्क्रिप्ट वाचून दाखवले गेले आणि जिहाद्यांना मदत करण्याची भाषा वापरली गेली. त्यामुळे शिवाजी पार्क आता गोमूत्राने शिंपडून शुद्ध केले पाहिजे. महाराष्ट्राचा हिंदू समाज या टोळीला कधीच माफ करणार नाही.” सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाची आठवण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना राणेंनी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा संदर्भ दिला. “दिशा सालियनच्या वडिलांच्या एफआयआरमध्ये स्वतः उद्धव ठाकरेंच्या मुलाचे नाव आले होते. तुम्ही मुख्यमंत्री असताना सुशांत सिंग राजपूतचा जो काही कार्यक्रम नाईट लाईफ गँगने केला, तसे आता आमच्या राज्यात होत नाही. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आमच्या सरकारने अवघ्या २४ तासांत गुन्हेगारांना पकडले. मुलाचे थेर लपवण्यासाठी आम्ही पोलिसांचा वापर करत नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला. ‘मुलगा पुढचे नवीन वर्ष जेलमध्ये तर साजरा करणार नाही?’ ‘एप्रिलमध्ये मोदी सरकार पडणार’ या संजय राऊतांच्या दाव्यावर नितेश राणे यांनी थेट इशारा दिला. “एप्रिलपर्यंत आमचे सरकार पडण्याची कोणतीही शक्यता नाही. पण तुझा मालकाचा मुलगा जानेवारी २०२७ ची सकाळ मातोश्रीमध्ये बघतो की आर्थर रोड जेलमध्ये बसून ‘हॅपी न्यू इयर’ करतो, याची पहिली चिंता कर,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. ———————– हेही वाचा.. शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात: म्हणाले- गद्दारांना 50 खोके अन् शेतकऱ्याला 5 हजार? भाजपसोबत युतीत 25 वर्षे सडली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपासून ते ‘ऑपरेशन टायगर’, हिंदुत्व, माध्यमांची भूमिका आणि भाजपच्या राजकीय रणनीतीपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. “गद्दारांना ५० खोके देतात आणि शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देतात,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले. तसेच भाजपने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा घेतल्याचा आरोप करत त्याला ‘संभ्रम घोटाळा’ असे नाव दिले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *