Headlines

भंडाऱ्यात महाप्रसादातून विषबाधा:खराशी गावातील 200 जणांची प्रकृती खालावली; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी




भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावात महाप्रसादातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका कार्यक्रमानंतर महाप्रसाद ग्रहण केलेल्या सुमारे १५० ते २०० नागरिकांची प्रकृती अचानक खालावली असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास मिळालेल्या माहितीनुसार, महाप्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच आणि सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना उलट्या, मळमळ आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकाच वेळी अनेक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने परिस्थिती गंभीर बनली. रुग्णालयांत उपचारासाठी गर्दी त्रास वाढू लागल्याने सकाळपासूनच बाधितांनी उपचारासाठी रुग्णालयांकडे धाव घेतली. सध्या अनेक रुग्णांवर परिसरातील ग्रामीण आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. आरोग्य विभागाकडून गावातच वैद्यकीय कॅम्प घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि वेळेवर उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाकडून खराशी गावामध्येच विशेष वैद्यकीय कॅम्प लावण्यात आला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून वैद्यकीय पथकाकडून रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या सर्व रुग्णांवर वैद्यकीय निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अन्नविषबाधेचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर अनेक नागरिकांची प्रकृती एकाच वेळी खालावल्याने अन्नविषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, महाप्रसाद तयार करताना किंवा त्याचे वितरण करताना नेमकी कोणती त्रुटी झाली, अन्न दूषित झाले होते का आणि त्याचा नागरिकांच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेतील बाधितांची अधिकृत संख्या, रुग्णांची प्रकृती आणि विषबाधेचे कारण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ——————– हेही वाचा.. अमित शहा नव्हे, तर उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातील दाऊद इब्राहिम: दसरा मेळाव्यातील टीकेवर नितेश राणेंचा पलटवार, म्हणाले- शिवाजी पार्क गोमूत्राने शुद्ध करा
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून ठाकरे गटाने भाजप आणि महायुतीवर केलेल्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केल्यानंतर, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना थेट ‘दाऊद इब्राहिम’शी केली आहे. तसेच, शिवाजी पार्कवर शरियाची गुंज ऐकू आल्याचा आरोप करत हे मैदान गोमूत्राने शुद्ध करण्याची मागणी राणे यांनी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *