Headlines

Praveen Darekar Slams Sanjay Raut Over Cabinet Remarks


“राज्याचे मंत्रिमंडळ ही सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे. अशा कॅबिनेटमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचे लोक बसले आहेत, असा पोरकट आणि बेताल आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविरोधात येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात थेट हक्कभंग प्रस्ताव आणू. माध्यमांसमोर य

.

राऊतांवर हक्कभंग आणणार!

संजय राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळाची तुलना गँगस्टर्सशी केल्याप्रकरणी दरेकर अत्यंत आक्रमक झाले, “संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये बिश्नोई गँगचे सदस्य बसले आहेत. हा महाराष्ट्राच्या सर्वोच्च मंत्रिमंडळाचा अक्षम्य अपमान आहे. या विधानाची गंभीर दखल घेऊन आगामी विधिमंडळ अधिवेशनात आम्ही संजय राऊत यांच्याविरोधात थेट हक्कभंग प्रस्ताव दाखल करू.”

यंत्रणांवर अविश्वास

“राऊतांचा संविधानाने स्थापन केलेल्या कोणत्याही स्वायत्त संस्था आणि पोलीस यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी माध्यमांसमोर रोज निराधार विधाने करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात किंवा संबंधित यंत्रणांकडे जावे.”

फडणवीसांच्या नजरेत गुन्हेगार हा गुन्हेगारच

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले, “अभिनेता सलमान खान असो वा टायगर श्रॉफच्या घराजवळील घटना; फडणवीस साहेबांनी तत्काळ भूमिका घेत पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली आणि अवघ्या काही तासांत आरोपींना गजाआड केले. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी फडणवीसांच्या नजरेत तो गुन्हेगारच असतो. बिश्नोई अमित शाहांचे ढोकळे खातो, असे म्हणणारे राऊत म्हणजे निव्वळ हास्यास्पद विधाने करणारे नेते आहेत. देशाचे गृहमंत्री गँग चालवतील, असा मूर्खपणा केवळ राऊतच बोलू शकतात.”

500 कोटींचा विषय रामदास कदमांनी संपवला

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या 500 कोटींच्या कथित आरोपावर राऊत करत असलेल्या चौकशीच्या मागणीवर दरेकर म्हणाले, “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणी, पोलीस बदल्या आणि भ्रष्टाचाराच्या ठोस पुराव्यांवरून तुरुंगात जावे लागले होते. जरांगे यांच्या आरोपांवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात जाहीरपणे रोखठोक उत्तर दिले आहे. त्यामुळे नसता विषय कुठेही जोडून 500 कोटींचा कांगावा करणे थांबवावे. शिंदे साहेबांचा अशा कोणत्याही व्यवहाराशी दुरान्वयेही संबंध नाही.”

मुख्यमंत्री पदासाठी 145 चे संख्याबळ लागते

गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना दरेकर यांनी भाजपची भूमिका मांडली. “लोकशाहीत प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची किंवा आपल्या नेत्याला त्या पदावर पाहण्याची इच्छा असणे गैर नाही. मात्र, त्यासाठी सभागृहात 145 आमदारांचे स्पष्ट संख्याबळ लागते. आज भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असून देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तूर्तास मुख्यमंत्री बदलाचा कोणताही विषय अस्तित्वात नाही.”

सहकाऱ्यांचा सत्यानाश होण्याची भाषा अयोग्य

“एकनाथ शिंदे यांच्या आड येणाऱ्यांचा सत्यानाश होईल, अशी वक्तव्ये महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभत नाहीत. मित्रपक्षांचे वाटोळे व्हावे, अशी कोणाचीही भावना असू नये. निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळते, तो पक्ष आणि महायुती मिळून यावर निर्णय घेत असते.”

पुण्यातील बॅनरवरून वातावरण कलुषित करण्याचे कारस्थान!

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि गोळवलकर गुरुजी यांच्या छायाचित्रांवरून सुरू झालेल्या वादावर दरेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि राहतील; त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे राष्ट्रउभारणीतील योगदानही देशाला ठाऊक आहे. एखादा बॅनर लावून जाणूनबुजून वातावरण तापवणे ही काही समाजकंटकांची ठरलेली कार्यपद्धती आहे. अशा प्रवृत्तींचा शोध घेऊन पोलिसांनी समाजात शांतता राखली पाहिजे.” उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्या शिल्लक राहिलेल्या पक्षाकडे लक्ष द्यावे आणि महायुतीवर टीका करणे थांबवावे, असा खोचक सल्लाही आमदार प्रवीण दरेकर यांनी शेवटी दिला.

—————————————————-

हेही वाचा…

अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!: संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार

“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.