Headlines

शेतकरी, मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी करणार मदत:कर्ता हनुमान मंडळाची सामाजिक बांधिलकी‎




डाबकी रोडवरील वानखेडे नगर श्रीकर्ता हनुमान मंडळाच्या वतीने महिला गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मात्र गरबा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या या उत्सवातून यंदा सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. यंदा पावसाअभावी अनेक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन गरबा उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा आणि वाचवलेल्या पैशांतून गरीब शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील दोन मुलींच्या विवाहासाठी मदत करण्याचा निर्णय मंगला म्हैसने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. या दोन्ही विवाह समारंभांसाठी सुमारे १०० लोकांच्या जेवणाचा खर्च, हॉलचा खर्च आणि ब्राह्मणांचा खर्च गरबा व शारदा उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. उत्सवाचा आनंद सामाजिक सेवेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने, ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना उकर्डे, विलास धरस्कार, विठ्ठल चिकटे, संतोष जाधव, नलिनी पटोकार, आशा वेध, अनुराधा वंजारे, किर्ती राठोड, शिल्पा भटुरकर, गायत्री वेध, शीला माळी, चित्रा पटोकार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रेखा भटुरकर यांनी केले. प्रास्ताविक माजी नगरसेविका मंगला म्हैसने यांनी केले, तर आभार नीतू धारस्कर यांनी मानले. गरबा उत्सवातील बक्षीस वितरण समारंभ गरबा उत्सवातील बक्षीस वितरण शिवसैनिक मुन्ना उकर्ड, विलास धारस्कर आणि माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांच्या सौजन्याने करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष वर्षा राऊत, तालुका प्रमुख रेश्मा शहा, माजी नगरसेविका मंगला म्हैसने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. उत्सवात प्रथम क्रमांक शिल्पा भटूरकर, द्वितीय क्रमांक जोत्स्ना लोडम, तृतीय क्रमांक पूर्वा म्हैसने, चतुर्थ क्रमांक अर्पिता उन्हाळे, पाचवा क्रमांक दानवी देसाई यांनी पटकावला. शारदा देवीची मूर्ती भेट देणाऱ्या अनुराधा वंजारे यांचा सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *