Headlines

400 घरे, 1800 दुचाकी, 150 चारचाकींसह दागिन्यांची खरेदी:सोन्याचे दर दीड लाखांच्या आत, जीएसटी कपातीमुळे कारमध्ये बचत‎




अकोलेकरांनी दसऱ्याचा मुहूर्त साधत १५० कार, १८०० दुचाकी, सोने आणि ४०० फ्लॅट्स व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी केली आहे. सोन्याचे दर दीड लाखांच्या आत आल्याने दागिन्यांना तर जीएसटी कपातीने लहान कारवर ग्राहकांना ५० हजार ते एक लाखांपर्यंतचा फायदा होत आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अकोल्याची बाजारपेठ सजली असून शहराला मांगल्याचे तोरण लागले. टू-बीएचके अफोर्डेबल घरांना पसंती : ग्राहकांची ८०० ते ८५० चौरस फुटांच्या टू-बीएचके फ्लॅट्सना पसंती मिळत आहे, असे बांधकाम व्यावसायिक मनोज महाजन व पंकज कोठारी यांनी सांगितले. शहरात १० ते १५ प्रमुख बिल्डर्स आहेत. अकोलेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे ४०० घरांची खरेदी केली आहे. ग्राहकांनी बँकेतून लोन घेताना अप्लाय केल्यास पीएम आवास योजनेतील अनुदान खात्यात जमा होते, त्याचाही लाभ ग्राहक घेत आहेत. सोन्याचे भाव कमी होऊन दीड लाखांच्या आत आल्याने खरेदी वाढली आहे. मुहूर्तावर मंगळसूत्र, राणी हार व इतर दागिन्यांची खरेदी केली. दर कमी झाल्याने नागरिक लग्नसराई व दिवाळीसाठीही ॲडव्हान्स बुकिंग करत असल्याने खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडेलवाल यांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर मारुती सुझुकीच्या ५० हून अधिक कारचे बुकिंग झाले आहे. जिल्ह्यात दरमहा सरासरी ४०० कारची विक्री होते. शासनाने जीएसटी कपात केल्याने अल्टो के-१० एस्प्रेसो आदी पाच लाखांच्या आतील छोट्या कारच्या किंमती ५० हजार ते एक लाखांपर्यंत कमी झाल्याचे खंडेलवाल ऑटो व्हिल्सचे वसंत बाबू खंडेलवार यांनी सांगितले. सराफा : दर नियंत्रणात, लग्नसराईचीही बुकिंग ट्रॅक्टर : अनुदानामुळे शेतकऱ्यांची मागणी शेतकरी सध्या मोठ्या एचपीच्या ट्रॅक्टरला पसंती देत आहेत. तसेच आंतरमशागतीसाठी छोट्या ट्रॅक्टरला मागणी असून त्याची किंमत साडेपाच लाख आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनेंतर्गत एक ते सव्वा लाखांपर्यंत शासकीय अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली आहे, असे स्वराज ट्रॅक्टर्सच्या संचालक स्नेहल ढवळे यांनी सांगितले. दुचाकीत ई-व्हीची धूम पारंपरिक पेट्रोल दुचाकींच्या तुलनेत ई- व्ही स्कूटर्सना प्रचंड मागणी आहे. परंतु या दुचाकींचा वेटिंग पिरियड अधिक आहे. इंधनाचा वाढता खर्च आणि सोयीमुळे ग्राहक ई-व्ही दुचाकींना पसंती देत आहेत, असे हिरो शोरुमचे अंकित भट्टड व टीव्हीएस शोरुमचे राहुल पाटील यांनी सांगितले. पेट्रोल विभागात हिरो स्प्लेंडर प्लसला अधिक मागणी आहे. एका डीलरकडून २५० ते ३०० दुचाकी म्हणजे प्रमुख चार कंपन्यांच्या डीलर्स आणि काही ईव्हीचे स्पेशल डिलर्स यांच्याकडून दसऱ्याला सुमारे १८०० दुचाकींची विक्री झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *