![]()
शिवतीर्थावर आयोजित ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत चौफेर फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी मंचावरून बोलताना राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईशी करत अत्यंत गंभीर आरोप केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला ‘बिकाऊ मालाचा मेळावा’ म्हणत जोरदार खिल्ली उडवली. ‘अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई’: संजय राऊत यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. “लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. अमित शहा हेच लॉरेन्स बिश्नोई आहे. ज्यांच्यावर देशाच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तेच माफिया आहे. देशातील सर्व गुंड आणि माफियांची टोळी गुजरातचे अमित शहा चालवतात,” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. आम्हाला दिल्लीत ‘रेजिम चेंज’ करायचे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘सामने टिकाऊ माल, तिकडे बिकाऊ माल’ राज्यात दोन शिवसेनेचे मेळावे होत असल्याच्या प्रश्नावर राऊत भडकले. ते म्हणाले, “दोन मेळावे होतायत असे विचारणाऱ्या पत्रकाराला मी शटअप (चूप बसा) सांगितले. शिवसेना एकच आहे, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची. शिवतीर्थावर समोर बसलेला हा ‘टिकाऊ माल’ आहे आणि तिकडे गेलेला ‘बिकाऊ माल’ आहे. तिकडे कसला मेळावा? ते दांडिया खेळत बसले असतील. त्यांच्याकडे कोणताही विचार किंवा संघर्ष नाही.” एकनाथ शिंदेंना इशारा शिंदे गटाला उद्देशून राऊत यांनी थेट इशारा दिला. “इथे प्रत्येकाच्या हातात बांबू आहे, गद्दारांना तो कुठे जाईल हे कळणारही नाही. या शिवसेनेशी पंगा घेण्याचे प्रयत्न गेल्या ६० वर्षांत अनेकांनी केले, भले-भले आले आणि गेले, पण या गर्दीला कधी ओहोटी लागली नाही.” १०६ हुतात्म्यांचे स्मरण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचा संदर्भ देत, मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण राऊत यांनी करून दिली आणि शिवतीर्थावरील प्रत्येक पिढी बाळासाहेबांच्या विचारांनी धगधगत असल्याचे सांगितले. —————– हेही वाचा.. शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात:म्हणाले- गद्दारांना 50 खोके अन् शेतकऱ्याला 5 हजार? भाजपसोबत युतीत 25 वर्षे सडली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपासून ते ‘ऑपरेशन टायगर’, हिंदुत्व, माध्यमांची भूमिका आणि भाजपच्या राजकीय रणनीतीपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. “गद्दारांना ५० खोके देतात आणि शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देतात,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले. तसेच भाजपने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा घेतल्याचा आरोप करत त्याला ‘संभ्रम घोटाळा’ असे नाव दिले. सविस्तर वाचा
Source link
अमित शहा हेच खरे लॉरेन्स बिश्नोई:शिवतीर्थावरून संजय राऊतांचा केंद्रीय गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप