![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (सोमवारी) दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर एका ‘राष्ट्रीय विषयावर’ विशेष पत्रकार परिषद घेणार असून, यातून ते कुणाला धक्का देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यासोबतच, नागपूरमध्ये पक्षाकडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठणाचे आंदोलन करण्यात येणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे खुले निमंत्रण संजय राऊत यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे आज देणार मोठा धक्का? संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या आगामी भूमिकेबाबत मोठा सस्पेन्स निर्माण केला आहे. राऊत म्हणाले, “आज दुपारी १२.३० वाजता मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. ते एका अत्यंत महत्त्वाच्या ‘राष्ट्रीय विषयावर’ भाष्य करणार आहेत. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर नक्की कुणाला धक्का बसतो, ते आपल्याला बघावेच लागेल.” राऊतांच्या या विधानामुळे ठाकरे आज नेमका कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. नागपुरात रामरक्षा पठण नागपूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आयोजित करत असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली. “आम्ही या आंदोलनासाठी अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी मागितलेली नाही. नागपुरात अनेक राम मंदिरे आहेत. आम्ही तिथे जाऊन केवळ रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणणार आहोत. लोकांमध्ये जागृता आणणे, हाच यामागचा आमचा मुख्य उद्देश आहे,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीसांना दिले खुले निमंत्रण रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठणाच्या या मुद्द्यावरून राऊतांनी थेट भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना मी जाहीर निमंत्रण देतो की त्यांनी आमच्या या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावे,” असा चिमटा राऊत यांनी काढला. आंदोलन राजकीय आहे का? राऊतांचे स्पष्टीकरण ‘हे आंदोलन एखाद्या राजकीय पक्षाकडून केले जात आहे का?’ असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, राऊत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. हे केवळ राजकीय आंदोलन नसून लोकांमध्ये हिंदुत्वाची आणि धर्माची खरी जागृती निर्माण करण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे त्यांनी सुचवले. हेही वाचा.. पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा..
Source link
संजय राऊत म्हणाले- ठाकरेंची आज विशेष पत्रकार परिषद:नागपूरच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे फडणवीसांना दिले निमंत्रण