अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सध्या मनोरंजन विश्वापेक्षा राजकीय वर्तुळात चांगलीच तापली आहे. भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी आमिर खानवर टीका करत त्याला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटल्यानंतर, आता या वादात ‘एमआयएम’चे नेते वारिस
.
नीतेश राणेंच्या विधानाचा समाचार घेताना वारिस पठाण म्हणाले की, नीतेश राणे यांना आमिर खानचा हेवा वाटत असावा आणि म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत. आमिर खानने तीन लग्नं केली आहेत, मग तुम्ही चार लग्नं का करत नाही? तुम्हाला कोणी रोखलंय? तुम्हाला याचा इतका हेवा का वाटतोय? असा उपरोधिक सवाल पठाण यांनी विचारला.

तुम्हालाच याचा त्रास का होतोय?
वारिस पठाण म्हणाले की, या तिसऱ्या लग्नाला आमिर खानच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नी उपस्थित होत्या. त्यांची मुलं, जावई, मित्र आणि देशातील मोठे उद्योगपतीही तिथे हजर होते. जेव्हा कुटुंबातील आणि नातेवाईकांमधील कोणालाही या लग्नावर आक्षेप नाही, तर मग नेमका तुम्हालाच याचा त्रास का होतोय? असा सवाल पठाण यांनी केला आहे.
राणेंना ‘जिहाद’ या शब्दाचा अर्थही माहीत नाही
वारिस पठाण म्हणाले की, देशात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह होत नाहीत का? नीतेश राणेंना ‘जिहाद’ या शब्दाचा अर्थही माहीत नाही. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यासाठी ही अशी बिनबुडाची विधाने केली जात आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसेच, आमिर खानने कायद्याच्या चौकटीत राहून आणि स्वतःच्या इच्छेने हा विवाह केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लव्ह जिहाद’चे ब्रँड ॲम्बेसेडर- राणे
मंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना थेट टीकास्त्र सोडले आहे. “जेव्हा समाजात अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा या लोकांकडे “लव्ह जिहाद’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का, अशी चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. त्यांनी हिंदू समाजाला आवाहन करताना, अशा व्यक्तींचे चित्रपट पाहण्यापूर्वी समाजाने गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही दिला आहे.
समाजासमोर उघडे पाडा- शिरसाट
या वादात उडी घेत मंत्री संजय शिरसाट यांनी आमिर खानला डोक्यावर घेणाऱ्यांवर जोरदार टीका केली. शिरसाट म्हणाले, “एक, दोन आता तिसरे लग्न झाले आहे. येत्या काही वर्षांत तो चौथे लग्न करेल, त्यांना जणू काही लग्नांचा परवानाच मिळाला आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना आता समाजासमोर उघडे पाडण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
संबंधित वृत्त वाचा
आमिर खानकडे लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का?:आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून नीतेश राणेंचा घणाघात

आमिर खानचा तिसरा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा या लोकांकडे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का? ही चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. हिंदू समाज बांधवांनी सावधान रहावे, असे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर कुठेही दिसले तर यांचे चित्रपट पाहायचे का हे देखील ठरवायला हवे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर