'पद कितीही मोठे असले तरी बहिणीसाठी मी भाऊच!':पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात बहिणींच्या घरी जाऊन साजरे केले रक्षाबंधन
पदे बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात आणि काळ पुढे सरकतो. मात्र भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, माया आणि जिव्हाळा कायम तसाच राहतो. याच भावनेचा प्रत्यय रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी चोपडा येथे आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणी निर्जलाताई देशमुख आणि सुशीलाताई गुजर यांच्या घरी जाऊन अत्यंत कौटुंबिक व आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधन साजरे केले….