आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि व्यायाम अत्यंत आवश्यक- गोरे:पाथर्डीमध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सध्याच्या धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शरीरासोबतच मनाची मजबुतीही महत्त्वाची असून त्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन बेस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाऊसाहेब गोरे यांनी केले. पाथर्डी येथील चॅम्पियन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व आनंददायी शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तालुका तायक्वांदो अकादमीचे सचिव अंबादास साठे…