Headlines

युवकांनी बैलगाडी ओढून नाथवंशजांना पार करून दिला 5 किमीचा घाट




“माझ्या जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी…’ या अभंगाच्या स्वरांनी आसमंत दुमदुमला, टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांची डौलदार उधळण आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा बीड जिल्ह्यातील हटकरवाडी (ता. पाटोदा) येथील गारमाथ्याच्या डोंगरातून होणारा खडतर पण तितकाच रोमांचकारी प्रवास सोमवारी भक्तिभावात पार पडला. निसर्गरम्य डोंगररांगांमधून पाच किलोमीटर पालखी ओढण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.४ जुलै रोजी श्रीक्षेत्र पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेली नाथांची पालखी सध्या बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातून मार्गक्रमण करत आहे. डांबरीकरण केल्यास प्रवास जलद होईल “चार किलोमीटरचा डोंगर पार करण्यासाठी भाविकांना अधिक वेळ लागतो. या मार्गाचे डांबरीकरण झाल्यास पालखी सोहळा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया रेखाताई कुलकर्णी यांनी दिली. प्रशासनाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी या भागातील रस्ते अतिशय अरुंद आणि खडतर आहेत. प्रशासनाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी. लवकर डांबरीकरण करावे. जेणेकरून वारकऱ्यांचा प्रवास सुकर आणि जलद होईल. – रघुनाथबुवा गोसावी, दिंडीप्रमुख



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *