![]()
अमरावती गेल्या काही दिवसांत दमदार हजेरी लावून पावसाने सरासरी गाठली असली, तरी मान्सूनमध्ये अचानक पडलेल्या खंडामुळे अवघ्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून जलसाठे, रखडलेली पेरणी आणि बाजारपेठेतील व्यापार-उदीम या सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. परंतु गेल्या चार दिवसांतील खंडामुळे तो पुन्हा सुमारे १५ टक्क्यांनी माघारला आहे. पावसाने सरासरी गाठल्यामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, पाऊस अचानक गायब झाल्याने जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांमधील जलसाठ्याची टक्केवारीही घटली आहे. काही भागांत उन्हाचा चटका वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, आगामी काळात पाऊस न परतल्यास पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सुरुवातीच्या दमदार आगमनानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, आता ऐन पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बियाणे अंकुरण्यात अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात मान्सूनचा उर्वरित,पान.४ ३ मध्यम प्रकल्पाचा जलसाठा घटला जिल्ह्यात शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, गर्गा व बोर्डीनाला असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर, सपन आणि बोर्डीनाला या तीन मध्यम प्रकल्पाचा जलसाठी घटला आहे. गतवर्षी चंद्रभागा प्रकल्पाच्या जलसाठ्याची आजच्या तारखेची टक्केवारी ३९.७३ होती, ती यावर्षी ३३.४१ टक्क्यांवरच थांबली आहे. सपन प्रकल्प गतवर्षी या तारखेपर्यंत ६८.१९ टक्क्यांवर पोहोचला होता, तो यावर्षी ४१.१७ च्या पुढे जायला तयार नाही. तर तिकडे बोर्डीनाला प्रकल्प गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्क्यांनी घटला आहे. हवामान अंदाज काय ? ^हवामान तज्ज्ञांच्या मते आणखी ५ दिवस म्हणजेच १८ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या काही भागांत केवळ किरकोळ पाऊस पडेल. त्यामुळे पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी २० जुलैनंतरच पेरणीचा मुहूर्त काढावा. मान्सूनच्या वाऱ्यांची गती तात्पुरती मंदावल्याने हा खंड पडला आहे. पुढील काही दिवसांत हवेचा दाब बदलून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. पीके वाचवणे हे मोठे आव्हान असणार आहे. – प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ.
Source link
चार दिवसांत सरासरीवरून पाऊस 76 टक्क्यांवर:शेतकरी चिंताग्रस्त, बाजारपेठेतील व्यापार क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम