![]()
मागील वर्षी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. शेतकऱ्यांनी खरीप पीक हंगामात दमदार पेरणी केली होती. मात्र अतिपावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. तर यंदाच्या वर्षी रोहिणी, मृग, आर्द्रा कोरडी गेल्याने सोलापूर जिल्हा अद्याप कोरडाच राहिला आहे. मात्र तालुक्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत, सव्वा महिना झाला तरी पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर उगवलेले खरी कोमेजत आहे. यंदाच्या वर्षी शेतकऱ्याने खरीप पीक हंगामाची जोरदार तयारी केली होती. मात्र पावसाने गैरहजेरी लावल्याने मागील वर्षी ५८.४४ टक्के तूर पेरणी झाली होती. तर यंदाच्या वर्षी ४३ टक्के तूर पेरणी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १५.४४ टक्के खरीप हंगामात तूर पेरणी कमी झाली आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे खरीप हंगाम पेरणीसह पिके धोक्यात येत आहेत. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने आधीच पेरण्या लांबल्या होत्या. ^”यंदाचा खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे हातातून निघून गेला आहे. पावसाचे असमान वितरण खरीप पेरण्यांसाठी धोक्याचे बनले आहे. जिल्ह्यांत सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अशा स्थितीत खरिपाच्या पेरण्या गतवर्षीच्या तुलनेत १५.४४ टक्क्यांनी पिछाडीवर आहेत.” हर्षद निगडे, तालुका कृषी अधिकारी, मोहोळ
Source link
पावसाने पाठ फिरवल्याने केवळ 20 टक्के खरीप पेरणी:तालुकानिहाय एकूण खरीप हंगाम पेरणीची टक्केवारी