Headlines

‘जगात भारी सायकल वारी’ वारी परिवाराने दिला नारा, 1000 किमी पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंचा सन्मान‎




पंढरपूर येथे आयोजित पाचव्या अखिल महाराष्ट्र सायकल वारी व रिंगण सोहळ्यात मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने ‘जगात भारी सायकल वारी’ हा नारा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा संगम घडविणाऱ्या या सायकल वारीत राज्यभरातील सुमारे पाच हजार सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रेल्वे मैदानावर झालेल्या सायकल रिंगण सोहळ्यात सायकलपटू भक्तिरसात तल्लीन झाले. यावेळी पंढरपूर सायकल वारी चॅलेंजमध्ये ६० राईड पूर्ण करून १,००० किलोमीटर सायकलिंगचा टप्पा गाठणाऱ्या १५ सायकलपटूंचा पदक देऊन गौरव करण्यात आला. तसेच वारी परिवार सायकल क्लबला विठ्ठलाची मूर्ती प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सायकल संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी पंढरपूर सायकल्स क्लब आणि नाशिक सायकलिस्ट यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह पृथ्वीराज कलुबर्मे, शिवतेज कलुबर्मे, केदार हजारे, जयंत पवार, चंद्रकांत काकडे, प्रा. महेश अलिगावे, राहुल सावंजी, प्रफुल्ल सोमदळे, रतीलाल दत्तू, संजय जावळे, सचिन साळुंखे, तानाजी हेंबाडे, दत्तात्रय जाधव, सिद्धेश्वर डोंगरे, भारत नागणे, यश महामुनी, प्रमोद महामुनी, अविराज जाधव, नंदकुमार नागणे, समर्थ महामुनी, कमलेश माळी, भारत (सोनू) नागणे, गणेश मोरे, रविराज जाधव, प्रा. विनायक कलुबर्मे आदी सदस्य उपस्थित होते. ‘सायकल चालवा, इंधन वाचवा’ चा दिला संदेश नगर प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठलनामाच्या गजरात सायकल वारी पार पडली. ‘सायकल चालवा, इंधन वाचवा’, ‘झाडे लावा-झाडे जगवा’, ‘व्यसनापासून दूर राहा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करा’ असे जनजागृतीपर संदेश देणारे फलक सहभागींचे विशेष आकर्षण ठरले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *