Headlines

एनसीएमसी कार्डसाठी वयोवृद्धांची परवड, पैसे भरुनही कार्डसाठी चकरा:ऑगस्टपासून सवलत बंदची भीती; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे‎



‘मार्च महिन्यात एनसीएमसी कार्ड काढले होते, परंतू आता १३ जुलै येऊनही एनसीएमसी कार्ड मिळाले नाही’, तीन महिन्यांपासून चकरा मारतोय मात्र एसटी प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नाही. २०० रुपये देऊनही कार्ड नाही, अशी व्यथा येथील बसस्थानक क्रमांक-१ मध्

.

यातील कुणी शहरातील तर बहुतांश ग्रामीण भागातील ज्येष्ठ होते. वाडेगाव, आलेगाव, कापशी आदी गावांमधून ग्रामस्थ एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आले होते. सोमवारी १३ जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून ते बसस्थानकात (क्रं. १) आले. परंतू जेथे एनसीएमसी कार्ड काढण्यात आले होते ती रूम आता कुलूपबंद असून त्यावर ‘१२ जुलैपासून एनसीएमसी कार्ड काढणे बंद आहे’, अशी सूचना लिहिण्यात आली आहे. दुसरीकडे १ ऑगस्ट २०२६ पासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी एसटी विभागातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ‘आता ते बंद झाले आहे, देणारा हजर नाही, कंत्राटदाराने बनवलेच नाही, आम्हाला याबाबत माहिती नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

त्यामुळे तिकिट खर्च करुन व रोजगार बुडवून एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना परत जावे लागत आहे. यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. कुणी दोन महिन्यांपूर्वी कार्ड काढले तर कुणी तीन महिन्यांपूर्वी परंतु त्यांना अजूनही कार्ड मिळाले नाही. त्यामुळे हे ग्रामस्थ चकरा मारून वैतागले आहेत. एनसीएमसी कार्ड काढण्याची मागणी काही सामान्य नागरिकांची नव्हती एसटी प्रशासनाने सवलतीत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, असे सांगत राज्यभरातील आगारांमध्ये एनसीएमसी कार्ड काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रत्येक कार्डमागे २०० रुपयांचे शुल्क नागरिकांकडून भरून घेतले. नागरिकांनी रांगा लावत व बायामेट्रिक पद्धतीने ही कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर नागरिकांना रिसिप्ट देऊन आठ ते दहा दिवसांनी कार्ड मिळणार, तुम्हाला तसा मेसेज येणार, असे सांगण्यात आले.

सुरुवातीला हे सुरळीत चालले. मात्र, नंतर एनसीएमसी कार्ड काढणे व त्याचे वितरण करण्यात एसटी प्रशासनाकडून दिरंगाई होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे. धरसोड धोेरणाचा फटका आता नागरिकांना बसत आहे. नेमके करायचे काय आहे, हे एसटी प्रशासनाला स्पष्ट नसल्याने यात वयोवृद्ध नागरिक विनाकारण भरडले जात आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने एनसीएमसी कार्ड बंधनकारक आहेत की नाही, नागरिकांनी हे कार्ड काढायचे की नाही, ज्यांनी काढले आहेत, त्यांना ते मिळणार की नाही, हे स्पष्ट करावे, अशी मागणी संबंधित नागरिकांमधून होत आहे.

एनसीएमसी कार्ड कुणासाठी ज्येष्ठांचे हाल थांबेनात एनसीएमसी कार्ड हे एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू आहे, असे एसटी प्रशासनाने हे कार्ड काढण्यास सुरुवात केली तेव्हा सांगितले होते. यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा प्रवास चालू ठेवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *