![]()
अकोले नगरपंचायतीच्या राजकारणात आगामी ४ दिवसांत मोठा भूकंप होणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडगे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी पूर्ण कंबर कसली आहे. त्यानुसार शुक्रवारी, १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोल
.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या “नमुना अ” नोटीसीनुसार, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांच्यासह एकूण १३ नगरसेवकांनी २० मे रोजी दिलेल्या मागणीपत्रानुसार ही कार्यवाही होत आहे. या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे काम पाहणार आहेत.
या राजकीय उलथापालथीमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या अकोलेतील दशकांच्या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान मिळाले आहे. पिचड गटाचे नगराध्यक्ष वडजे आणि उपनगराध्यक्ष नवले यांना पद गमवावे लागल्यास नगरपंचायतीची सत्ता पूर्णपणे शिंदे गटाच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. बहुमत पाठीशी असतानाही केवळ अंतर्गत हेकेखोरपणामुळे पिचड गटाला आपल्याच नगरसेवकांना गमावावे लागत असल्याचे चित्र आहे. हा धक्का पचवून पिचड गट अकोल्यात पुन्हा कसा उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वडजे-नवले गटाचे डावपेच; न्यायालयीन लढाईची तयारी दुसरीकडे, सत्ताधारी वडजे-नवले गटाने अद्याप हार मानलेली नाही. १७ जुलैची विशेष सभा थांबवण्यासाठी न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय, ऐनवेळी काही “जादुई” राजकीय डावपेच खेळून सत्ता राखण्यासाठी त्यांचे समर्थक ‘लास्ट मिनिट’ फिल्डिंग लावत आहेत. त्यामुळे १७ जुलै रोजी न्यायालयीन लढाई होते की सभागृहातच बहुमताचा कौल लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल