Headlines

विट्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात उपोषण




तालुक्यातील विटा येथील गट क्रमांक ३५, सर्व्हे क्रमांक १५ मधील गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे, या मागणीसाठी विटा येथील ग्रामस्थ भगवान ठोकळ आणि अर्जुन खरात यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील ७२ एकर शासकीय गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. या शासकीय जमिनीवर चक्क आलिशान बंगले, विहिरी, कांद्याच्या चाळी आणि पाइपलाइन उभारण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक तलाठी आणि ग्रामसेवकांमुळे या अतिक्रमणधारकांना विविध शासकीय योजनांचे लाभही लाटता आले, असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे. एकीकडे गावातील दलित, वंचित व भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी जमीन नाही आणि दुसरीकडे शासकीय जमिनीची उघड लूट सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. गायरान जमिनीची मोजणी करून अतिक्रमण निष्कासित करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता तहसीलदारांच्या आदेशानंतर प्रशासन काय कारवाई करते का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे निर्देश Ãशासकीय परिपत्रकानुसार सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मुख्य जबाबदारी संबंधित विभागाची आहे. विटा येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांना दिले आहेत. यासाठी आवश्यक ते पोलीस संरक्षण घेऊन रितसर कारवाई करण्यात येईल. -सारिका भगत, तहसीलदार, कन्नड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *