![]()
डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, दोन सहकारी डॉक्टर, महिला परिचारिका व कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन, अमरावती शाखेतर्फे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आयएमए अमरावतीचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे व सचिव डॉ. विक्रम वानखडे तसेच राष्ट्रीय आईएमएचे सहसचिव डॉ. वसंत लुंगे यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीतील सर्व डॉक्टर व वैद्यकीय सहकाऱ्यांनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. निषेध कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज येथे एकत्र येऊन झाली. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष निवेदन सादर करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने कडक कायदे लागू करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर होणारे हल्ले हे अत्यंत निंदनीय आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. आम्ही सर्व डॉक्टर एकजुटीने अशा हल्ल्यांचा निषेध करतो.” या निदर्शनात डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. अलका कुथे , डॉ. अनिल रोहणकर, डॉ. श्याम राठी, डॉ. जयंत पांढरीकर, डॉ. राजेश बूब, डॉ. धीरज सवाई, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. आनंद काकाणी, डॉ. अद्वैत पानट, डॉ. पवन अग्रवाल, डॉ. स्वप्निल शिरभाते , डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. सुमेधा पांढरीकर, डॉ. नितीन जयस्वाल, डॉ. रोहन बोबडे, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ललित चव्हाण, डॉ. अमोल ढगे, डॉ. परीक्षित ठाकरे, डॉ. विवेक कावलकर, डॉ. अभिलाष पोहोकर, डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. संग्राम देशमुख, डॉ. संगोले, डॉ. शलाका बारी, डॉ. तृप्ती दानखडे, डॉ. पंकज इंगळे, डॉ. राजेश मुंदे, डॉ. विजय कुथे, डॉ. एस. के. पुंशी, डॉ. शैलेश जैसवाल, किशोर बनसोड, डॉ. सुयोगा पानट, प्रकाश कुटे तसेच आयएमए अमरावतीचे अनेक ज्येष्ठ व तरुण सदस्य सहभागी झाले होते.
Source link
डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने:जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; दोषींवर कारवाईची मागणी