Headlines

दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘परवाच तर जाऊन आलो:केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, या राजकीय चर्चेला खुद्द फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्र्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन, आलो, मिश्कील टि

.

फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल आणि त्यांच्या जागी बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. या विधानामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीच्या अफवांना नव्याने बळ मिळाले. राऊतांच्या दाव्याचे खंडण करताना बावनकुळे म्हणाले, राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे नेतृत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. आगामी काळातही तेच मुख्यमंत्री राहावेत, अशी राज्यातील जनतेची भावना आहे.

शरद पवारांकडून एनडीएचे कौतुक

राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील ५० हजारांची कमाल मर्यादा आणि आगामी पीककर्ज भरण्याची जाचक अट रद्द केली. या निर्णयाचे शरद पवार यांनी स्वागत केले.

दिल्लीवारीचा सस्पेन्स

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत स्थायिक होणाऱ्यावर म्हटले, “परवाच तर मी दिल्लीला गेलो होतो.” त्यांनी स्पष्ट उत्तर देणे अत्यंत चतुराईने टाळले.

‘दिल्लीवारी’च्या चर्चेमागे आमदारांची खदखद, की भाजपची खेळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावले जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आमदारांना भेटण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने नाराज आमदारांनीच ही वावटळ उठवल्याची चर्चा आहे. मात्र, “मी परवाच दिल्लीला गेलो होतो,” असा मिश्किल टोला लगावत फडणवीसांनी या चर्चेची खिल्ली उडवली. दरम्यान, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. भाजपमधून मराठा चेहरा म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील शर्यतीत आहेत. संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव पुढे करत संभ्रम निर्माण केला, मात्र ‘२०३४ पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील’ असे सांगत बावनकुळेंनी वाद टाळला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *