Headlines

खतांचा अतिरेक टाळा, नैसर्गिक शेतीकडे वळा‎:राहुरी कृषि विद्यापीठाकडून दोन हजार वारकरी-शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीचे धडे



संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने वारकरी-शेतकऱ्यांसाठी विशेष कृषि प्रबोधन व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियान

.

कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून आणि अधिष्ठाता डॉ. सात्ताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर यांनी, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून नैसर्गिक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. तसेच १३ ते १९ जुलै २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय परिसंवादाचा लाभ घेण्यास सांगितले.

या जनजागृती अभियानात तज्ज्ञ प्राध्यापकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले: डॉ. अविनाश गोसावी: गांडूळखत निर्मिती, जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढवणे. डॉ. विकास लोंढे व डॉ. श्रद्धा बगाडे: हवामान आधारित नियोजन आणि दामिनी व मेघदूत अॅपचे प्रात्यक्षिक. १५ जुलैनंतरच्या उशिरा पेरणीसाठी योग्य वाणांचे महत्त्व. डॉ. विलास करडे: जिवाणू खते, ट्रायकोडर्मा आणि रोग-कीड नियंत्रणासाठी जैविक उपाय. डॉ. अशोक जाधव व डॉ. राजेंद्र खडतरे: अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान व प्रशिक्षण. डॉ. प्रितम शिंदे: तांबेरा रोगास प्रतिकारक सोयाबीनचा ‘फुले दुर्वा’ हा नवीन वाण. डॉ. संतोष मोरे व डॉ. नाझीर तांबोळी: भाजीपाल्यावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन. डॉ. लीना शितोळे: टिश्युकल्चरद्वारे केळी रोपे निर्मिती.

“विठ्ठल नामाच्या आध्यात्मिक लाभासोबतच आधुनिक शेतीचे अमूल्य ज्ञान मिळाल्याने ही आमच्यासाठी ‘कृषि पंढरीची वारी’ ठरली, अशा भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *