Headlines

युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह:अयोध्या राम मंदिरातील अपहारप्रकरणी एल्गार‎




प्रभू श्रीरामांच्या पवित्र अयोध्यानगरीतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी युवक काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले, असा घणाघात यावेळी डॉ. देशमुख यांनी केला. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेच्या अपमानाचा निषेध व्यक्त केला. प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपात्रांमधील देणग्यांचा कथित गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हा सत्याग्रह केवळ राजकीय नसून, श्रद्धेच्या रक्षणासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभू श्रीरामाचे मंदिर हे राष्ट्राच्या एकतेचे प्रतीक आहे. त्यांच्या मंदिरातील देणग्यांचा गैरव्यवहार हा संपूर्ण हिंदू समाजावर घाला घालणारा आहे. त्यामुळे खऱ्या दोषींना शिक्षा देण्याच्या मागणीच्या प्रचंड घोषणा यावेळी देण्यात आल्या. प्रभू श्रीरामाच्या अयोध्या येथील मंदिराबाबत कायम राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार दानपात्रात झालेल्या लुटीवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. या देणग्यांच्या लूट प्रकरणात पहिला एफआर दाखल करायला १८ दिवसांचा वेळ लागला. आंदोलनात काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर तथा मनपा विरोधीपक्ष नेते विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, माजी महापौर मिलिंद चिमोटे व अशोक डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, युवक उर्वरित,पान.४



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *