![]()
पर्यावरण संवर्धन आणि ‘हरित अमरावती’च्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशाने बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता दुभाजकाच्या कॅरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वाढते तापमान, झाडांची होणारी कत्तल, शहरीकरणामुळे कमी होत चाललेली हरित संपदा आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी ‘दिव्य मराठी’च्या आवाहनानुसार “एक वृक्ष- एक जीवन’ हा संकल्प करुन अमरावती शहर अधिक हरित करण्याची यावेळी शपथ घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विजय लोखंडे, शिक्षण विभागाचे लेखाधिकारी मिलिंद देवरे, एलआयसीच्या विभागीय कार्यालयाचे अधीक्षक गजानन गवई, गुरुद्वारा गुरुसिंह सभेचे कार्याध्यक्ष रवींद्रसिंग उर्फ बीट्टू सलूजा, प्राचार्य संजय खडसे, फादर आरोग्य स्वामी, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी प्रमोद तलवारे, रणजीत चव्हाण, अनिल गोटे, प्राचार्य सुनील रामटेके, सारिका वानखडे, प्रवीण वानखडे, प्रा. संजय शेंडे, आणि अमित आयुष उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. तसेच भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कसे आवश्यक आहे, याची मांडणी केली. वृक्ष जगला तरच सृष्टी कायम राहणार असून त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला आसेगावचे भदंत मास्तवीर बुद्धघोष (आसेगाव), धम्मचारी महास्थातम, धम्मचारी प्रियघोष, धम्मचारीनी विद्यासुची, जमाते इस्लामी हिंदचे मौलाना साजिद, हाजी शकील साहेब, सरफराज खान, बबलू खान, जमील खान, आजी-माजी सैनिक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गायकवाड, समता सैनिक दलाच्या जिल्हा संयोजिका आशा इंगळे, गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त अरुणकुमार आठवले, सेवानंद वाकोडे, प्रा. डॉ. वासू विके, राजकुमार राजाने, व्यंकटराव खोब्रागडे, पांडुरंग सुर्वे, राष्ट्रपाल घरडे, विजय गणवीर, नाना रंगारी, दिनेश पाटील, मनोज शेगावकर, मनोहर गजभिये, देवानंद पाटील, यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचा सोहळा या सोहळ्याला एसडीओंसह, मनपा आणि इतर कार्यालयांचे विभागप्रमुख तर उपस्थित होतेच, शहरातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, आणि विशेषकरुन हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई अशा सर्व धर्मांचे प्रमुखही उपस्थित होते. त्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचा सोहळा ठरला.
Source link
‘हरित अमरावती’साठी वृक्षारोपण, ‘एक वृक्ष-एक जीवन’चा संकल्प:बुद्ध जयंती उत्सव समिती, सुखाय फाउंडेशनचा पुढाकार