Headlines

माहूरजवळ भाविकांचा टेम्पो दरीत कोसळल्याने भीषण अपघात:रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी




तीर्थक्षेत्र माहूरजवळ असलेल्या किरोळी घाटात भाविकांचा भरधाव टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला. यवतमाळ येथून आलेले हे भाविक माहूरच्या रेणुका मातेचे दर्शन घेऊन पुन्हा यवतमाळकडे परतत असताना हा त्यांच्यावर काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील काही भाविक टेम्पोने माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास टेम्पोने यवतमाळच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, माहूर जवळील किरोळी घाटात एका धोकादायक आणि नागमोडी वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव टेम्पो थेट दरीत कोसळला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून बचावकार्य अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनीही घटनास्थळी त्वरित धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बचावकार्य करत दरीत कोसळलेल्या टेम्पोमधून जखमींना आणि मृतदेह बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे यवतमाळ आणि माहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे ही वृत्त वाचा नात्यातील तरुणीशी का बोलतो म्हणत छातीमध्ये चाकू भोसकून तरुणाचा खून:संभाजीनगरच्या गारखेड्यातील साईनगर भागातील घटना, बीडला पळालेल्या आरोपीस अटक
नात्यातील एका तरुणीशी बोलत असल्याच्या रागातून एका 19 वर्षांच्या तरुणावर एकाने चाकूचे 3 वार करून त्याची हत्या केली. गारखेड्यातील साईनगर भागात बुधवारी ( 14 ऑक्टोबर) रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तौसिफ शमीम शेख (19, रा. साईनगर, गल्ली क्र. 3) असे मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर खासगी बसने थेट बीडला पळून गेलेल्या आदित्य अशोक शेळके (19) या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ आणि आदित्य हे एकाच परिसरात राहणारे आहेत. बुधवारी रात्री गारखेडा भागात आदित्यच्या नात्यातील तरुणीशी तौसिफ बोलत होता. हे पाहताच आदित्यने तौसिफला हटकले. ‘तू माझ्या नात्यातील मुलीशी का बोलतोस?’ यावरून दोघांमध्ये झटापट झाली. यानंतर रात्री 10.30 ला तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मीर शेख हे नूर मशिदीच्या पाठीमागे बसले असताना आदित्य चाकू घेऊन तेथे आला. काही समजण्याच्या आतच त्याने तौसिफच्या छातीत, नाकावर आणि डोक्यावर चाकूने तीन वार केले. जखमी तौसिफला आधी एमजीएममध्ये तर नंतर घाटीत दाखल केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *