Headlines

पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा‎



संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग

.

नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वर महाराजांचे एक भव्य, डोळे दीपवणारे शिल्प उभारण्यात आले आहे. त्यासोबतच नेवासा येथील ऐतिहासिक ‘पैस खांबाची’ हुबेहूब आणि आकर्षक प्रतिकृती येथे साकारण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी लख्ख चमकणारा ‘ज्ञानेश्वरी घाट’ हा एलईडी फलक येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेत असून, परिसराच्या वैभवात यामुळे मोठी भर पडली आहे.

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदयन गडाख यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन नेटकेपणाने केले. वारकऱ्यांच्या श्रद्धेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालून घाटावरील या देखण्या कलाकृती तयार करून घेतल्या. नामकरण सोहळ्यादरम्यान हजारो भाविकांनी टाळ-मृदंग आणि विण्याच्या झंकारावर ठेका धरत माऊलींच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण केला आणि संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

या ऐतिहासिक सोहळ्याला राम महाराज झिंजुर्के, नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, डॉ. निवेदिता गडाख, रविराज गडाख यांच्यासह यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य आणि पंचक्रोशीतील हजारो वारकरी-माऊली मोठ्या संख्येने उपस्थित होते. इमामपूर घाटाचे ‘ज्ञानेश्वरी घाट’ नामकरण प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक, देविदास महाराज म्हस्के, माजी मंत्री शंकरराव गडाख, राम महाराज झिंजुर्के, उदयन गडाख व इतर संत-महंत. छाया : राहुल राजळे.

घाट वारकऱ्यांच्या ऊर्जेचे केंद्र या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले देविदास महाराज म्हस्के आणि उद्धव महाराज मंडलीक (नेवासेकर)म्हणाले, “या घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव मिळणे म्हणजे वारकरी संप्रदायाचा आणि संत साहित्याचा फार मोठा गौरव आहे. पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या लाखो माऊलींसाठी हे स्थान नवचैतन्य देणारे ठरेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *