![]()
सिल्लोड विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आणि निरोगी समाजाची निर्मिती करण्यासाठी ज्ञानविकास प्राथमिक शाळेत नशामुक्त व बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत व्यसनमुक्तीची व बालविवाह जनजागृतीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. अंमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या चिंताजनक आहे. शिवाय मुलींची तोडकी संख्या विचारात घेता बालविवाह पाहिजे त्या प्रमाणात रोखणे शासनासही शक्य होत नाही. आम्ही शपथ घेतो की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल समाजात जनजागृती करेल आणि इतरांनाही नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेल. व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. शिवाय अशाच आशयाची बालविवाह होऊ देणार नाहीत, करणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार १३ जुलै ते ३१ जुलै असे दोन आठवडे हे अभियान व वेगवेगळ्या उपक्रम माध्यमातून राबवले जाणार आहे. शाळा स्तरावर शालेय व ग्राम सहभागातून हे अभियान राबवले जात असल्याचे सिल्लोड शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
Source link
ज्ञानविकास शाळेत नशामुक्त वबालविवाह जनजागृती अभियान:व्यसन, नशा करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणार नसल्याची घेतली