Headlines

संभाजीनगरात 3 कोटींचे दूषित खाद्यतेल जप्त:संभाजीनगरसह पैठणच्या 2 कंपन्यांवर एफडीएची धाड, जुने डबे, गंजलेली यंत्रे अन् तेलावर घाणीचा थर



अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी (११ जुलै) शहरातील दोन नामांकित खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनांवर छापे टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा साठा जप्त केला. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील मे. बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स (गट नं. ७२) आणि लक्ष्

.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दोन्ही कंपन्यांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केल्याची माहिती सहायक आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या अचानक तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवालानंतर पुढील कडक कारवाई केली जाईल.

अन्न व औषधी विभागाने छाप्यात जप्त केलेला मुद्देमाल असा

तेलाचा प्रकार साठा (किलोत) किंमत रिफाइंड पाम तेल (सुटे) ५०,८४६.८८ ७८,५६,१५१.९६ रु. रिफाइंड सोयाबीन तेल(सुटे) ६१,६५०.६६ ९७,०९,९७८.९५ रु. रिफाइंड कपाशी तेल (सुटे) ३९,२७०.५० ६२,६३,६४४ रु. अज्ञात वनस्पती तेल (सुटे) ९९८ ९९,८०० रु. रिफाइंड पाम तेल (डबे) ३,८५९ ५,९६,२१५.५ रु. रिफाइंड पाम तेल (टाकी) ६,११४ २,४९,३६३ रु. रिफाइंड कपाशी तेल (डबे) ५,१०१ ८,३६,५६४ रु. रिफाइंड कपाशी तेल (टाकी) १६,२२० २६,६०,४०८ रु. रिफाइंड सोया. तेल (टाकी) ६,५८५ १०,६३,४७७.५ रु.

रिफायनरीतील यंत्रसामग्री, परिसरात प्रचंड धूळ, जळमटे, गंज, घाण. पॅकिंगसाठी जुन्या डब्यांचा सर्रास वापर. उघड्या टबमध्ये दुर्गंधीयुक्त तेल साठवण. बंद रिफायनरी, चालू रिपॅकिंग विभाग एकाच आवारात असल्याने तेल दूषित होण्याचा मोठा धोका. प्रयोगशाळा, तांत्रिक कर्मचारी, विश्लेषण प्रमाणपत्र वा पॅकेजिंगचे फूड ग्रेड प्रमाणपत्र नव्हते. तेल साठवणुकीच्या ओव्हरहेड टाक्या व पाइपलाइनवर लेबल नव्हते. टाक्या प्रचंड घाणीमुळे काळ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *