Headlines

रेल्वेत कामाच्या ताणामुळे होटगीस्टेशन मास्तर टाॅवरवर चढला:आत्महत्या करण्याचा प्रयत्न, तीन तास आंदोलनानंतर खाली उतरले




कामाची जबाबदारी नसताना काम लावणे, रेल्वे डीआरएम कार्यालयात बोलावून दिवसभर बसवून ठेवणे, कर्तव्याचा भाग नसताना सुरक्षा कवच टॉवरवर चढवून काम करायला लावल्याने होटगी स्टेशन येथील स्टेशन मास्तर यांनी शनिवारी सकाळी स्टेशन येथील सुरक्षा कवचच्या टॉवरवर १०० फूट वर चढून आंदोलन सुरू केले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दोन ते तीन तास सुरू होतो. शेवटी त्यांची समजूत काढून त्यांना खाली येण्यास प्रवृत्त करण्यात आले. सत्येंद्र नारायण सिंह असे त्या स्टेशन मास्तरचे नाव आहे. चौकशीची कर्मचारी संघटनेची मागणी याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेने केली आहे. अधिकाऱ्याकडून जाणूनबुजून छळ किंवा असुरक्षित काम करून घेतले जात असेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत सत्येंद्र सिंह यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मोबाइल घेतला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता हा प्रकार आमच्यापर्यंत आला नाही असे म्हणत अधिक बोलणे टाळले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *