![]()
गोलटगावकडून करमाडच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जालन्याकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावरील करमाड येथील एका हॉटेलसमोर घडली. चैनसिंग शिवसिंग मारग (७०, रा. वडाचीवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हे पत्नी कस्तुराबाई मारग (६५) यांच्यासह दुचाकीने (एमएच २० ईपी ७१३४) जात होते. रविराज हॉटेलजवळ आले असता, भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी चैनसिंग मारग यांना मृत घोषित केले. कस्तुराबाई यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत चैनसिंग मारग यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
Source link
अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये पती ठार; पत्नी गंभीर जखमी:करमाड येथे अपघात; अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू