Headlines

टोमॅटोचे दर घसरल्याने करमाड येथे शेतकऱ्यांचा 30 मिनिटे रास्ता रोको:जालना महामार्गावर वाहतूक कोंडी, बाजार समितीत 17 हजार क्रेट आवक‎




छत्रपती संभाजीनगर उपबाजार समितीच्या करमाड बाजारात टोमॅटोच्या दरात अचानक घसरण झाल्याने बुधवारी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. मंगळवारी १० ते १७ रुपये किलो असलेला दर बुधवारी थेट ८ ते १३ रुपयांवर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कालचा दर आजही मिळालाच पाहिजे अशी मागणी करत जालना महामार्गावर ३० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बुधवारी बाजारात टोमॅटोची तब्बल १७ हजार क्रेटची प्रचंड आवक झाली. बियाणे, खते, मजुरी आणि वाहतुकीचा वाढता खर्च पाहता मिळालेला दर तुटपुंजा असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एकाच दिवसात झालेल्या या दरघसरणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. सभापती श्रीरामबाबा शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली. व्यापाऱ्यांना पारदर्शक व्यवहार करण्याचे निर्देश दिले. सभापतींच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले. दरनिश्चितीसाठी विश्वासात घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी मांडली. करमाड येथील जालना महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *