![]()
आधी एमपीएससीने पेपर फुटल्याचे नाकारले, आता भरती रद्द
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची पहिली तक्रार २३ मार्च रोजी एफडीएकडे झाली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. २१ जुलै रोजी एमपीएससीकडे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ई-मेलवर तक्रार केली. तेव्हाही पे
.
या प्रकरणी एमपीएससीचा अवर सचिव अभिजित लेंडवे, दोन सहायक कक्ष अधिकाऱ्यांसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील, पेपर खरेदी करणारा विद्यार्थिनी ऋतुजाचा वडील तथा शहादा तालुक्यातील मुख्याध्यापक,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अमृत पाटील, विद्यार्थिनीचा मित्र गौरव पाटील यांनाही अटक झाली असून सत्र न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृत पाटील यांनी आपल्या मुलीसाठी पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद देत कौटिल्यचा संचालक प्रवीण पाटीलने जाळे विणले. एमपीएससीचे अवर सचिव लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी नकाते, मराठेंनी पेपर फोडून प्रवीण पाटीलला दिला. त्याने तो अमृत पाटील यांना दिला. त्यात १०० पैकी ८८ प्रश्न जशेच्या तसे होते.
पेपरफुटीची तक्रार देणाऱ्या, परीक्षेवर संशयाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अहिल्यानगरच्या विद्यार्थ्याचीच साडेसहा तास चौकशी
मंगेश फल्ले. पुणे | अहिल्यानगर येथे मेडिकल व्यवसाय करत परीक्षेची तयारी करणाऱ्या ऋषिकेश गांगर्डेनेही एमपीएससीकडे २१ जुलैला तक्रार केली. निकालानंतर परीक्षेवर संशय व्यक्त करणारा व्हिडिओही त्याने व्हायरल केला होता. मात्र मुंबई सीआयडी पथकाने त्याचीच साडेसहा तास चौकशी करत घरझडती केली. बँक खाती तपासली. त्याचा व्हिडिओ पाहून नंदुरबारच्या गौरव पाटीलने ऋषिकेशला २३ जुलैला पेपरचे काही स्क्रीनशॉट पाठवले. २४ जुलैला गौरव, ऋषिकेशनने एमपीएससी कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार केली. तुकाराम मुंढेंनाही माहिती दिली. ऋषिकेशच्या माहितीवरून रोहित पवारांनी २७ जुलै रोजी पेपरफुटीचा आरोप केला. तेव्हा तक्रारदार परीक्षेत नापास झाल्याने तो पेपरफुटीचा कांगावा करत असल्याचे एमपीएससीने म्हटले होते.
पुण्यात राज्यभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येतात. काही विद्यार्थी क्लासचालकांना हाताशी धरून संघटनांच्या आंदोलनातून अर्थकारण साधत असल्याचे काही प्रकरणांत समोर आले. अशाच प्रकारे आैषध निरीक्षक परीक्षेत काही विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांच्या बँक खात्यावर पावणेदोन कोटी रुपयांच्या व्यवहाराची चर्चा टेलिग्रामवरील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर रंगली आहे. त्यामुळे पुण्यातही लवकरच चौकशी सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा- रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले की, दलालांमार्फत राज्यभरात प्रत्येकी ४० लाख रुपयांना पेपर विकला गेला. १९९७ नंतर पहिल्यांदाच एमपीएससीचा पेपर अशा प्रकारे फुटला आहे. या गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा.
तुकाराम मुंढेंनाही पेपरफुटीचे सांगितले होते- तक्रारदार
औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर २० मार्च रोजी नाशिक विभागातील परीक्षार्थी ऋतुजा पाटीलने आपला मित्र गौरव पाटीलला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. त्या वेळी त्यांच्यातील संवाद दिव्य मराठीच्या हाती आला आहे. त्यानुसार नंदुरबारच्या कौटिल्य कोचिंग क्लासचा संचालक प्रवीण पाटीलने आयोगातील कर्मचाऱ्याकडूनच पेपर विकत घेऊन प्रत्येकी २० लाखांत सौदा केला होता. पेपर देण्यापूर्वी त्याने प्रत्येकी ५ लाख रुपये अॅडव्हान्स मागितले. ऋतुजाने व्हायरल केलेले ८५ प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आले होते. पण एमपीएससीने (२६ जुलै) पेपर फुटल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. आता एमपीएससी तोंडघशी पडली आहे.
ऋतुजाने ‘इम्पॉर्टंट’ असे लिहून २५ पानांचे पीडीएफ स्क्रीनशॉट गौरवला पाठवले होते
२० मार्च : रात्री १०.५५ ते ११.४८ : ऋतुजा : मोबाइल बघू देत नाही मला, काय ते मेसेज करून ठेव. हा क्वेश्चन सेट मला दिला आहे. यातून मुद्दाम १० प्रश्न मला चुकीचे सोडवायला सांगितले आहे. दुपारी ३.३९ ते ३.४३ : पप्पा बोलले घरीसुद्धा नको सांगू. मी माझ्या सख्ख्या भावालासुद्धा नाही सांगितलं म्हणे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणे, जे आहेत ते लग्नासाठी जमवले आहेत. कौटिल्यने पैसे मागितले उद्या ५ लाख. काही करून उद्या द्या मला म्हणाला आहे, पप्पा टेन्शनमध्ये आहेत, कुठून देऊ ५ लाख असं म्हणताहेत. २२ मार्च : दुपारी १२.२८ : ऋतुजा : त्याने हे क्वेश्चन दिले होते, त्यामधून ७८ क्वेश्चन आले होते. ते मी कन्फर्म सोडवले आहेत. ते सोडून दुसरे १३ सॉल्व्ह केले. असे टोटल ९१ मी सॉल्व्ह केले आहेत गौरव : ओके. क्वेश्चन पेपर भेटले असेल तर चेक करून घे. किती बरोबर येतात ते.