Headlines

प्रशासनाचे दुर्लक्ष:कन्नड शहरातील मुख्य व्यापारी नाका अतिक्रमणाच्या विळख्यात, दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक मेटाकुटीला‎




पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कन्नड शहरातील पिशोर नाका परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. शहराची मुख्य बाजारपेठ बनलेल्या या पिशोर नाका रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले असले, तरी व्यापारी व वाहनधारकांनी पार्किंगसाठी जागा न सोडल्याने हा रस्ता कोंडीचा केंद्रबिंदू ठरत आहे. या रस्त्यावर दुतर्फा दोनशेहून अधिक दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. तसेच तिरुपती हॉस्पिटल, लोहाडे दवाखाना, बीएसएनएल कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, अग्रसेन बँक यांसह अनेक पतसंस्था याच भागात आहेत. या ठिकाणी येणारे नागरिक आपली वाहने थेट रस्त्यावरच उभी करत असल्याने अर्ध्याहून अधिक रस्ता अडवला जातो. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी विश्वनाथ त्रिभुवन, चंद्रकांत लाडे, गोकुळ राठोड, सुभाष निकम, संतोष राजे जाधव, श्रीकृष्ण बडग, संदेश उदासी यांनी केली आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सहकार्य करावे नगरपरिषद, तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन पिशोर नाका परिसर तातडीने अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. या मोहिमेसाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरवला जाईल असे प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी आरती पवार यांनी सांगितले. तर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी नगरपरिषद लवकरच कठोर कारवाई करणार आहे. दररोजची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *