![]()
पैठण शहरातील स्वच्छता व जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पैठण नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार विलास भुमरे यांच्या पुढाकारातून अत्याधुनिक सक्शन व जेटिंग मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बुधवारी (२६) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, जितुभाऊ परदेशी, नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. ही आधुनिक मशीन उपलब्ध झाली असल्याने शहरातील विविध भागातील नाल्या चोकअप, गाळ काढणे सोपे होणार आहे, शहरातील पाइपलाइन, गटारी तसेच भूमिगत ड्रेनेज व्यवस्थेत वारंवार निर्माण होणारे चोकअप, गाळ व अन्य अडथळे दूर करण्यासाठी या यंत्राचा प्रभावी उपयोग होणार आहे. उच्च दाबाच्या पाण्याच्या फवाऱ्याद्वारे सुमारे १५० ते २०० फूट अंतरापर्यंतचे कठीण चोकअप दूर करता येणार आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित व प्रभावी सेवा मिळणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. स्वच्छता, जलनिस्सारण आणि सक्षम नागरी सुविधांच्या दिशेने पैठण नगर परिषदेचे हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. लवकरच शहर धूळ मुक्त करण्यासाठीदेखील मशीन घेतली जाणार असल्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले. शेखर शिंदे, जालिंदर आडसूळ, सुनील हिंगे, फाजल टेकडी, अजित पगारे उपस्थित होते.
Source link
पैठणला अत्याधुनिक सक्शन आणि जेटिंग मशीनचे थाटात लोकार्पण:खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती