![]()
राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले असून या विरोधात १ सप्टेंबरला मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये हजारो ओबीसी बांधवसहभागी होणार असल्याचा दावा प्रा.लक्ष्मण हाके यांनी बुधवारी केला. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी लागू केलेल्या मंडल आयोगामुळे ओबीसींच्या आयुष्यात नवीन पर्व आले होते. मात्र मागील तीन ते चार वर्षात राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असून स्वातंत्र्यांच्या लढ्याप्रमाणे पुन्हा एकदा ओबीसींच्या हक्काचा लढा उभा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ओबीसींचे आरक्षण संपले असूनही सत्ताधारी तसेच विरोधक बोलण्यास तयार नाहीत. ओबीसी आरक्षण कसे संपले नाही हे दाखवून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यातील दौंड येथून मुंबईच्या दिशेने कूच करणार मुंबईतील आंदोलनासाठी आवश्यक परवानगीचे अर्ज पोलिस प्रशासनाकडे दिले आहेत. १ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारस टोलनाका येथून हजारो ओबीसी बांधव मुंबईच्या दिशेने कुच करणार असल्याचे प्रा. हाके यांनी सांगितले.
Source link
आरक्षण संपवणाऱ्यांविरुद्ध मुंबईत आंदोलन- प्रा. हाके:1 सप्टेंबरला राज्यातील ओबीसी समाजबांधव मुंबईत धडकणार