![]()
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून शेतकरी केंद्रित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी जामनेर कृषी विभाग महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. सोमवारी सुधारित आकृतीबंधा विरोधात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधात प्रत्यक्ष क्षेत्रावरील कर्मचारी कमी करून कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. यामुळे क्षेत्रावर ५४ टक्केच कर्मचारी राहणार आहेत. त्यातही अनेक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने एका कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा अधिक क्षेत्राचा पदभार आहे. अशावेळी क्षेत्रावरील कर्मचारी कमी करून कार्यालयीन कर्मचारी वाढवणाऱ्या सुधारित पुनर्रचित आकृतिबंधास आमचा विरोध आहे. हा आकृतीबंध तत्काळ रद्द करून नवीन शेती निगडीत आकृतीबंध तयार करावा करावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदन येथील तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यांची होती उपस्थिती : संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद सुरडकर, जिल्हा संघटक अमोल झाल्टे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शिंदे, सचिव शाम दुसाने, उप कृषी अधिकारी किशोर पाटील, सुरेश लोहार, गजेंद्र चौधरी, गजानन साळोख, राजेंद्र ढेपले आदी कर्मचारी उपस्थित होते.
Source link
कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करावा- तहसीलदारांना निवेदन:जामनेर येथे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज