![]()
देशाच्या सीमेवर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देशबांधवासाठी व देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सर्व संकटाचा सामना करत पहारा देणाऱ्या वीर जवान बांधवांसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठवून आमचे खरे रक्षणकर्ते भाऊ तुम्हीच आहात हा कृतज्ञता भाव शह
.
राख म्हणाले, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात देशप्रेम व राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली. आपण या सैनिकांएवढाच आदर अहोरात्र काबाडकष्ट करून या देशासाठी अन्नधान्य पिकवणारे शेतकरी, पोलीस, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक व या देशाला विविध क्षेत्रात पुढे घेऊन जाणारे सर्वजण यांच्या प्रती सुद्धा कृतज्ञता भाव मनात बाळगला पाहिजे.या चिमुकल्या हातांनी तयार केलेल्या सुमारे ५०० पेक्षा जास्त राख्या भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून विनामूल्य भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना देशातील या चिमुकल्या बहिणींच्या प्रेमाची आणि आपुलकीची अनोखी भेट मिळणार आहे असे राख म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा तरवडे यांनी केले तर आभार शीला नांगरे यांनी मानले.
कार्यशाळेत तयार केल्या आकर्षक राख्या या उपक्रमासाठी शाळेत विद्यार्थिनींसाठी विशेष राखी निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत विविध रंगांचे धागे, मणी, सजावटीचे साहित्य आदींचा वापर करून राख्या कशा तयार कराव्यात, याचे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने व कल्पकतेने विविध प्रकारच्या सुंदर राख्या स्वतः तयार केल्या.