![]()
तिवसा तालुक्यातील सार्शी गाईची येथे मंगळवारी २५ ऑगस्टला दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणीस मान्यता मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांची रोष बघून प्
.
ग्रामस्थांनी २६ जानेवारीला अनुसूचित जाती वस्तीमध्ये दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणीस मान्यता मिळण्यासाठी शेकडो सह्यांचा रीतसर अर्ज केला होता. परंतु तहकूब सभेचे कारण पुढे करत सदर अर्ज ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला होता. अखेर २५ ऑगस्ट रोजीच्या विशेष सभेत प्रवेशद्वाराचा मुद्दा लावून धरल्याने ग्रामपंचायत प्रशासक व प्रशासकीय समितीने सभेतून काढता पाय घेतला. मात्र, एक प्रशासकीय सदस्य आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने वातावरण तापले आणि तत्काळ पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला. या वेळी चार वाजता वाजता वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी आंदोलनस्थळी धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व मागण्या लावून धरल्या. अखेर तिवसा तहसीलदारांनी रात्री १० वाजता मध्यस्थी करत ३१ ऑगस्ट रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले, तरी ३१ ऑगस्टच्या बैठकीत मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात द्वार उभारण्यावरून याआधीही आंदोलनं चिघळले असून सामाजिक तेढ, वादही निर्माण झाले . त्यामुळे एका समुदायाच्या मागणीनुसार द्वार उभे केल्याने दुसरा समुदाय दुखावू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सार्शीत तर दोन समुदायाने एकाच जागेवर द्वाराची मागणी केली. त्यामुळे या ठिकाणी निर्णय देताना तालुका प्रशासन वेळप्रसंगी जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे ठरेल. कायदेशीर बाजू व नियम बघूनच निर्णय दिला दोन्ही समुदायाला समजावून सुमध्य काढला तर शांततेत प्रकरण मिटेल. ^द्वार उभारणे हा ग्रामसभेचा विषय असून, सर्व नियम व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा विषय सोडविण्यात येईल. तसेच या मागणीबाबत गावातील सर्व ग्रामस्थांच्या भावना व अडचणीही समजून घेणे आवश्यक आहे. सर्वांची सहमती आणि गावातील सामाजिक सलोखा टिकवून निर्णय घेणे, ही भूमिका महत्त्वाची आहे. -रिना मंजू, सरपंच तथा प्रशासक. ^प्रवेशद्वाराबद्दल एकाच जागे करिता दोन अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यामध्ये गावाचे ग्रामदैवत पार्वती माता या नावाच्या प्रवेशद्वाराबद्दलही लोक आग्रही आहेत. कोणत्याही विषयावरून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार असून त्यांचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे. मात्र, प्रवेशद्वाराच्या मागणीचा विषयात वाद निर्माण होऊ नये यासाठी शांततेच्या मार्गाने हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. विकील वानखडे, ग्रा.पं. सदस्य.