![]()
शहरातून जाणाऱ्या देवीभोयरे फाटा ते खडकी (नगर) रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारा खासदार नीलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील ओटा, पायऱ्या व रस्त्याच्या कडेला असलेला कार्यालयाचा फलक आज खासदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी काढून घेतला. शहरातून ज
.
पर्यायी जागेची व्यवस्था करावी लागणार नीलेश लंके विधानसभा सदस्य झाल्यानंतर संपर्क कार्यालयासमोरील ओट्यावर तसेच मोकळ्या जागेत कार्यकर्त्यांच्या छोटेखानी बैठका, कार्यक्रम घेत असत.खासदार लंके कार्यालयात उपस्थित असतात त्यावेळी त्यांना विविध कामांच्या निमित्ताने भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची,सर्व सामान्यांची मोठी गर्दी होते.कार्यालयातील जागा अपुरी पडते.त्यामुळे या सर्वांना भेटण्यासाठी खासदार लंके याच जागेचा वापर करीत असत.आता मात्र पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.