![]()
जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला १९९४ मध्ये प्रथम मान्यता, १९१५ मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व २०११ मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे ४१ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या विविध प्रयत्नांचा आणि सिंचन योजनांच्या कामाची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकारांना दिली. ^कोणी काय केले आणि कोणी काय केले नाही, यापेक्षा तालुक्यासाठी आजपर्यंत काय केले हे जेन झी व अल्फा या तरुण पिढीला तसेच जुन्या पिढीतील विसरलेल्या लोकांना समजावे, यासाठी हा लेखाजोखा सादर केला आहे. दिलीप सोपल, आमदार, बार्शी १९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून उजनी बोगदा आणि बार्शी सिंचन योजनेला मंजुरी मिळाली . त्यानंतर १९९५ ला महायुती सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. २०११ मध्ये वाढीव कामास दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली. २००९ ते २०१४ या काळात शेवटचे दोन वर्षे मी मंत्री असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी मिळवला . २०१४ च्या अखेरीस पहिल्यांदा उपसा सिंचन योजनेचे पाणी उपळाईत ठोंगे, लक्षाचीवाडी परिसरापर्यंत पोहोचले.
Source link
बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता:आमदार बुरगुटे, पाटील, निंबाळकरांच्याकाळातही झाले सिंचनासाठी प्रयत्न