Headlines

राज्यातील रस्त्यांच्या दुतर्फा आता देशी वृक्षांची सावली:नुसती झाडे लावणार नाही, तर जगवण्यासाठी प्रणाली उभारणार- मंत्री भोसले




राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या वृक्षारोपणात स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत देशी प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धनावर शासन विशेष भर देणार असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीतील घट या पार्श्वभूमीवर प्रत्येक रस्ते प्रकल्पात पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाला महत्त्व दिले जात आहे. केवळ झाडे लावण्यावर भर न देता ती जिवंत राहून वाढावीत यासाठी प्रभावी देखभाल यंत्रणा उभारली जाणार आहे. स्थानिक प्रजातींच्या वृक्षांमुळे जैवविविधतेला चालना मिळते, पक्षी व वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होतो तसेच पाण्याचा वापरही तुलनेने कमी होतो. त्यामुळे संबंधित भागातील रोपवाटिकांतूनच देशी प्रजातींची रोपे खरेदी करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. वृक्षारोपण, पाणीपुरवठा, संरक्षण, छाटणी आणि नियमित देखभालीसाठी व्यापक कार्यपद्धती तयार केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येणार असून प्रत्येक रोपाच्या जतनासाठी निरीक्षण आणि जबाबदारी निश्चित करणारी प्रणाली विकसित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी केवळ ‘झाडे लावण्यावर’ भर दिला गेला, यामुळे झाडे जगण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे आता शासनाने आपली रणनीती बदलून ‘संवर्धनावर’ लक्ष केंद्रित केले जाईल. नियमित देखभालही करण्यात येणार यामध्ये स्थानिक (देशी) प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य असेल. संबंधित भागातील रोपवाटिकांतून रोपे खरेदी करण्यात येणार आहेत. वृक्षारोपणासह संरक्षण, पाणीपुरवठा व नियमित देखभालही करण्यात येईल. प्रत्येक रोपाच्या जतनासाठी निरीक्षण व जबाबदारी निश्चित असेल. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून संवर्धन मोहिमेला चालना मिळणार आहे. स्थानिक नागरिकांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करून त्यांनाही या प्रक्रियेत जोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. येथे होणार वृक्षारोपण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *