Headlines

नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई, 55 किलो गांजा जप्त:दोन तस्कर अटकेत, शांतीनगर परिसरात 16.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत




नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने शांतीनगर पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 54 किलो 998 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, रोख रकमेसह एकूण 16 लाख 51 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखेला शांतीनगरमधील दलाल चौक परिसरातील एका बंदिस्त टीनाच्या शेडमध्ये अमली पदार्थांची मोठी खेप आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी शेख जावेद वल्द शेख मुन्ना राहीन आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी या दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 13 लाख 74 हजार 950 रुपये किमतीचा सुमारे 55 किलो गांजा जप्त केला. याव्यतिरिक्त, आरोपींच्या अंगझडतीमधील 1 लाख 35 हजार 570 रुपयांची रोख रक्कम, एक लाख रुपये किमतीची सुझुकी बर्गमन मोपेड, दोन इलेक्ट्रिक वजनकाटे आणि 26 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात आहे. यापूर्वी जून महिन्यातही नागपुरात अशाच मोठ्या कारवाया करण्यात आल्या होत्या. वाडी पोलिसांनी अमरावती रोडवर 31 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला होता, तर रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वे स्थानकावर दोन तस्करांकडून तब्बल 34 लाख 71 हजार रुपये किमतीचा 34 किलोहून अधिक गांजा जप्त केला होता. जून महिन्यातील या मोठ्या कारवायांपाठोपाठ आता जुलै महिन्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली ही कारवाई नागपुरातील ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *