Headlines

वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन:वृत्तपत्र विक्रेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत; मिष्ठान्नाचे वितरण‎



थोर शास्त्रज्ञ, देशाचे माजी राष्ट्रपती व बालपणी वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दैनिक ‘दिव्य मराठी’च्या वितरण विभागाकडून वृत्तपत्र विक्र

.

भल्या पहाटे उठून ऊन, वारा, पाऊस व थंडीची पर्वा न करता वाचकांच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वृत्तपत्र विक्रेते करतात. त्यांच्या या सेवेमुळे समाजातील प्रत्येक घटकाला देश-विदेशातील घडामोडींची माहिती मिळते. त्यांचे परिश्रम व समर्पणाच्या गौरवासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे महान शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती म्हणून सर्वपरिचित आहेत. मात्र, बालपणी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचे काम सुद्धा केले होते. त्यांच्या जीवनातील हा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्रातूनही त्यांच्या जीवनप्रवासाची प्रेरणा मिळते.

यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बी. संतोष कुमार, हरीश येळणे, महेश सावरकर, विठ्ठलराव वानखेडे, अनिल पावडे, विजय भदिर्गे, सुधीर मेश्राम, ज्ञानेश्वर कोगदे, राहुल खोब्रागडे, राजू हिवरकर, गोपाल वाडेकर, चिंटू परळीकर आदी उपस्थित होते.

सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रात वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. दररोज पहाटेपासून वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या या घटकाच्या समस्या शासनाने समजून घ्याव्यात. त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बी. संतोष कुमार यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *