Headlines

Vinayak Raut On Son Girija Raut Allegations: Conspiracy Behind 2026 Complaint?


माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राऊत विरुद्ध सून असा थेट वाद पेटला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे

.

माजी खासदार विनायक राऊत यांनी सुनेचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत म्हटले आहे की, गिरीजा राऊत गेल्या 3 वर्षांपासून पती गितेश राऊत यांच्यासोबत राहत नाहीत. जर 2018 ते 2022 दरम्यान घरात अघोरी कृत्य केले जात होते आणि त्यावेळी गिरीजाचे आई-वडीलही सोबत होते, तर त्यांनी तेव्हाच तक्रार का केली नाही? इतकी वर्षे गप्प राहून 2026 मध्ये अचानक तक्रार दाखल करण्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे अघोरी उपाय केलेले नाहीत आणि या आरोपांचे आम्ही पूर्ण खंडन करतो, तसेच या प्रकरणी आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

12 कोटी आणि टेरेस फ्लॅटची मागणी

विनायक राऊत यांनी पैशांच्या मागणीवरून सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, गिरीजा हिने आमच्याकडे तब्बल 12 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये 5 कोटी रुपये रोख, मुंबईत 3 बीएचके टेरेस फ्लॅट, एक आलिशान कार आणि दर महिन्याला 2 लाख रुपये घरखर्च मिळावा, अशी तिची मागणी होती. आम्ही ही अवाजवी मागणी मान्य केली नाही, म्हणूनच केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी तिने आता हे खोटे आरोप करून प्रकरण बाहेर काढले आहे.

आज ना उद्या बदलेल या आशेने 7 वर्षे छळ सहन केला- गिरीजा राऊत

विनायक राऊत यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सून गिरीजा राऊत म्हणाल्या की, राऊत कुटुंबाने लग्नापूर्वी सर्व खोट्या गोष्टी सांगून आमची फसवणूक केली. लग्नानंतर संपूर्ण चित्र वेगळे होते आणि गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी माझा प्रचंड छळ केला. राऊत कुटुंबाची मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्याने आणि आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, सुखाने संसार होईल या आशेने मी इतकी वर्षे सर्व काही सहन केले आणि कुठेही तक्रार केली नव्हती. मी त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती किंवा पैसे मागितलेले नाहीत. त्यांनी माझा जो छळ केला, तो लपवण्यासाठीच ते आता खोटे बोलत आहेत.

संबंधित वृत्त वाचा

विनायक राऊत यांच्यासह मुलावर सुनेकडून छळाचा आरोप:केस कापले, बळजबरीने गोमूत्र पाजले म्हणत सुनेची पोलिसात तक्रार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचे कुटुंब एका मोठ्या वादात सापडले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पती, सासऱ्यांसह संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे नगरसेवक पुत्र गितेश राऊत, सासू शामल राऊत यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.