Headlines

माहिती अधिकाऱ्यांनी जनतेला तातडीने माहिती द्यावी:अमरावती विद्यापीठात माहिती अधिकार सप्ताहात आयुक्तांचे मत




माहिती अधिकार कायदा शासकीय कामात पारदर्शकतेसाठी आहे. जनतेने मागितलेली उपलब्ध माहिती तातडीने द्यावी, असे मत राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या माहिती अधिकार सप्ताह व्याख्यानात बोलत होते. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते अध्यक्षस्थानी होते, तर कुलसचिव डॉ. अविनाश असनारे उपस्थित होते. आयुक्त ठाकरे म्हणाले, कायद्यात माहिती देण्याबाबत स्पष्ट नियम आहेत. अर्ज आल्यावर माहिती अधिकाऱ्यांनी ती त्वरित देण्याचा प्रयत्न करावा. अनेक मुद्दे असल्यास, संबंधित विभागाने आपल्या भागाची माहिती देऊन इतर मुद्द्यांसाठी वेगळा अर्ज करण्यास सांगावे. कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, माहिती अधिकार कायद्यामुळे देशात सकारात्मक बदल झाला आहे. विद्यापीठाला दरवर्षी सुमारे एक हजार अर्ज मिळतात. विद्यापीठाने या कायद्याची जबाबदारीने अंमलबजावणी केली आहे. विद्यापीठात ८० माहिती अधिकारी असून, गेल्या २१ वर्षांत केवळ दोनच दंडाची प्रकरणे झाली आहेत. यामुळे कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होते. डॉ. विलास नांदुरकर यांनी सूत्रसंचालन केले, ओम जगताप यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *