![]()
अचलपूर शहरातील अल करीम कॉलनीत लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. दोन अनोळखी व्यक्ती घरात शिरल्या. त्यांनी घरातील एका सदस्याचे नाव घेत मित्र असल्याचे सांगितले. लग्नाची पत्रिका देण्याचा बहाणा करून पाणी आणि पेन मागितले. त्यानंतर त्यांनी एका महिलेचे तोंड दाबून तिला खोलीत बंद केले आणि चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. घरातील वृद्ध महिलेने शेजाऱ्यांना माहिती दिल्याने नागरिक जमा झाले. त्यामुळे संशयित पळून गेले. घटनेची माहिती मिळताच अचलपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून एक चाकू जप्त केला आहे. फरार संशयितांचा शोध सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Source link
लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला लुटण्याचा प्रयत्न:अचलपूरमधील अल करीम कॉलनीत घडली घटना, चाकू जप्त, आरोपी फरार