![]()
सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराकडे येणारी मुख्य जलवाहिनी बुधवारी सकाळी मोर्शी तालुक्यातील निंभी आणि पिंपळखुटा गावांदरम्यान फुटली. यामुळे अमरावती व बडनेरा उपनगराचा सायंकाळचा पाणी पुरवठा अचानक ठप्प झाला. सकाळी ९.३० वाजता हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्याने अर्धा तास पाणी वाया गेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (मजीप्रा) तात्काळ पंपिंग बंद करण्याचे निर्देश दिले. मजीप्राने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, पण रात्रीपर्यंतही दुरुस्तीच्या ठिकाणापर्यंत पोहोचता आले नाही. यामुळे गुरुवारीही पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. ही जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार फुटते; या वर्षातील ही चौथी घटना आहे. अमृत दोन योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, पण ते पूर्ण व्हायला वेळ लागेल. बुधवारी सायंकाळचा पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अमरावती व बडनेरा उपनगराला एक दिवसाआड पाणी मिळते. ज्यांना बुधवारी पाणी मिळणार होते, त्यांना आता आणखी दोन दिवस वाट पाहावी लागेल.
Source link
जर्जर जलवाहिनी फुटली, अमरावतीचा पाणी पुरवठा ऐनवेळी ठप्प:निंभी-पिंपळखुटा दरम्यान बिघाड, गुरुवारीही पाणी मिळण्याची शक्यता कमी